Next
‘कर्करोगाचा मुकाबला करण्यासाठी योजना तयार करावी’
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची सूचना
BOI
Friday, March 29, 2019 | 01:57 PM
15 0 0
Share this article:

'कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन'ला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपालांच्या हस्ते पोस्टाचे विशेष आवरण जारी करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष वाय. के. सप्रू, मुंबई विभागाच्या प्रधान पोस्ट मास्टर स्वाती पांडे उपस्थित होते.

मुंबई : ‘कर्करोगाच्या आव्हानाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधितांनी परिप्रेक्ष योजना तयार करावी,’ अशी सूचना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन या कर्करुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते भारतीय पोस्टाचे एक विशेष आवरण जारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

‘देशात मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रमुख कारणांमध्ये कर्करोगाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या तीन दशकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे आणि ते सातत्याने वाढत आहे. शासकीय संस्था, खासगी संस्था तसेच आशासकीय संस्थांनी एकत्रितपणे काम करून कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा सामान्य लोकांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. 


‘पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे, तर स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये, विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गुटखा खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये देखील वाढले असून, तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असेही राज्यपालांनी सांगितले.  या वेळी राज्यपालांनी संस्थेला कर्करुग्ण सेवाकार्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे अध्यक्ष वाय. के. सप्रू, मुंबई विभागाच्या प्रधान पोस्ट मास्टर स्वाती पांडे, तसेच उभय संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search