Next
‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एस्क्पिडिशन’चा शुभारंभ
प्रेस रिलीज
Saturday, March 24, 2018 | 04:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पिडिशन २०१८’ या गिर्यारोहण मोहिमेचा शुभारंभ फोर्स मोटर्स कंपनीच्या आकुर्डी प्रकल्पात ध्वज फडकावून झाला. कंपनीने पाठबळ दिलेल्या या मोहिमेत समुद्रसपाटीपासून आठ ८४८ मीटरवरील व पृथ्वीवरील सर्वाधिक उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर केले जाणार असून, त्यात पुण्यातील समीर पाथम व सौराज झिंगन हे गिर्यारोहक सहभागी झाले आहेत.

ही मोहीम एकूण ७० दिवसांची असून, त्यासाठी समीर व सौराज ही जोडगोळी २५ मार्च २०१८ पुण्यातून रवाना होणार आहे. पुण्यातून काठमांडूला पोचल्यावर त्यांना पाच हजार ४३७ मीटर उंचावर असलेल्या एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत पोचण्यास सुमारे दोन आठवडे लागतील आणि तेथून डोंगरात उंच तळ ठोकण्यासाठी तीन आठवडे लागतील. मे महिन्याच्या अखेरीस ते शिखरावर चढाईचा अंतिम प्रयत्न हाती घेतील.

ध्वज फडकावून या मोहिमेचा शुभारंभ करताना गिर्यारोहकांना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया यांच्या हस्ते बर्फात वापरण्याची कुऱ्हाड (आइस-ॲक्स) भेट देण्यात आली. या प्रसंगी फिरोदिया म्हणाले, ‘समीर व सौराजला या मोहिमेसाठी पाठबळ देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. समुद्रसपाटीपासून २९ हजार ५० फुटांवर, उणे ४० अंश सेल्शियस तापमानात, ताशी २०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि वातावरणात केवळ ३३ टक्के प्राणवायू अशा आव्हानात्मक स्थितीत एव्हरेस्ट शिखरावर चढाई करणे, ही टिकून राहण्याची आणि जिद्दीची खरी कसोटी असते. आयुष्यभराचा ठेवा ठरेल, अशा या कष्टसाध्य प्रयत्नासाठी फोर्स मोटर्समधील आम्हा सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा.’

समीर पाथमने युरोप, आफ्रिका, भारत व नेपाळमधील गिरीशिखरांवर चढाईचा ध्यास घेऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी सोडली आहे, तर सौराज झिंगन हा मानवी साधनसंपत्ती व्यावसायिक (एचआर प्रोफेशनल) व प्रमाणित स्काय डायव्हर असून, त्याला सात देशांमधील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याची इच्छा आहे.

‘प्रत्येक व्यक्ती आपल्यातील स्वतःचे एव्हरेस्ट जिंकण्याची आकांक्षा बाळगते आणि हेच स्वप्न त्यांची ओळख पुनर्स्थापित करते. आमच्यासाठी खरेखुरे एव्हरेस्ट सर करणे हीच आकांक्षा आहे. आम्ही याआधी सन २०१५ व सन २०१७ मध्ये तसा प्रयत्न कसोशीने केला होता; परंतु शिखर गाठण्याच्या अगदी जवळ पोचलो असताना आम्हाला आकस्मिक अडथळ्यांमुळे चढाई मधूनच सोडून द्यावी लागली. आता, मात्र हा अंतिम टप्पा साध्य करण्याचा निर्धार पूर्ण करण्याची संधी आम्हाला फोर्स मोटर्सने मिळवून दिली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत,’ अशी प्रतिक्रिया या दोघांनी व्यक्त केली आहे.

सौराज व समीरला शुभेच्छा, तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि या मोहिमेच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी फेसबुकवरील ‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पिडिशन २०१८’ या पानाशी जोडून घेण्याचे आवाहन यानिमित्त करण्यात आले आहे.


‘फोर्स मोटर्स लिमिटेड’विषयी
फोर्स मोटर्स ही आपल्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करणारी वाहन कंपनी असून, वाहनांचे सुटे भाग, उपउत्पादने व वाहने यांच्या संपूर्ण श्रेणीची रचना, विकास व निर्मिती करण्यात निपुण आहे. कंपनीची ट्रॅव्हलर व ट्रॅक्स वाहनांची श्रेणी बाजारपेठेत या गटात अव्वल आहेत.

फोर्स मोटर्स ही डॉ. अभय फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या कंपनी समूहातील आघाडीची असून, तिचे देशभरात १५ निर्मिती प्रकल्प व १४ हजार कर्मचारी असे भक्कम जाळे आहे. सन १९९७ मध्ये डेम्लर एजी समूहाने त्यांच्या मर्सिडिस कार भारतामध्ये बनवण्याचा निर्णय घेतल्यापासून त्या कारमध्ये बसवलेले प्रत्येक इंजिन फोर्स मोटर्सने तयार केले आहे. आजवर त्यांनी ८८ हजारांहून अधिक इंजिने मर्सिडिस बेंझ इंडिया कंपनीला पुरवली आहेत.

सन २०१५मध्ये बीएमडब्ल्यू समूहाने भारतात कार व एसयूव्ही उत्पादन करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्या संपूर्ण श्रेणीसाठी इंजिनांचे उत्पादन व चाचणी करण्यासाठी चेन्नई येथील आपल्या कारखान्याजवळ एक समर्पित प्रकल्प सुविधा सुरू करण्याची जबाबदारी फोर्स मोटर्सवर सोपवली. फोर्स मोटर्सने २३ हजारांहून अधिक इंजिने बीएमडब्ल्यू कंपनीला पुरवली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link