Next
महिंद्रा बाहा एसएईइंडिया स्पर्धेसाठी नोंदणी सुरू
प्रेस रिलीज
Thursday, May 03, 2018 | 03:50 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व वर्गाच्या पलीकडे जाऊन शिक्षण देणारा उपक्रम असलेल्या, ‘बाहा एसएईइंडिया’च्या २०१९ मधील पर्वासाठी   ‘महिंद्रा बाहाएसएईइंडिया’ने  नोंदणी सुरू केली आहे.  स्पर्धेचे हे १२ वे वर्ष असून, या स्पर्धेमुळे तरुण इंजिनीअर्सना आदर्श ऑल-टिरेन व्हेइकल तयार करण्यासाठी स्पर्धा करत असतानाच त्यांचे कौशल्य दाखवण्याची व पुस्तकी ज्ञानाचे रुपांतर प्रत्यक्ष अनुभवामध्ये करण्याची संधी मिळते. 

या सत्राची मध्यवर्ती संकल्पना ‘अॅडव्हेंचर रीलोडेड’ ही आहे. ती आव्हानात्मक स्पर्धेवर बेतलेली आहे व या द्वारे सहभागी संघांनी डिझाइनिंग, उत्पादन, ड्रायव्हिंग, टीमवर्क व कमाल काठीण्य पातळी याचा अनुभव घ्यावा, अशी बाहा एसएईइंडियाची अपेक्षा आहे.

नियमावलीचे ज्ञान, वाहनाचे डिझाइन, प्रोजेक्ट प्लान, डिझाइन पद्धत, डिझाइन मूल्यमापन योजना व तोंडी परीक्षा अशा सहा मुख्य निकषांनुसार प्रत्येक संघाचे परीक्षण केले जाईल. त्यानंतर त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी दोन प्रमुख कार्यक्रम होतील.भारतात इलेक्ट्रिक वाहतुकीला चालना देण्यासाठी नव्या असलेल्या ‘ई बाहा’ संघांना  बाहा एसएईइंडियाकडून दीड लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. संघामध्ये नॉन-मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थी असल्यास त्यांना व्हर्च्युअल बाहा फेऱ्यांदरम्यान अतिरिक्त गुणांचा लाभ मिळेल.

स्पर्धेसाठी २० मे २०१८ पर्यंत नोंदणी सुरू राहील.  १३ जुलै रोजी पंजाबमधील चित्कारा इथं ही स्पर्धा होईल. http://www.bajasaeindia.co.in/ येथे नोंदणी करता येणार आहे. अशी माहिती बाहा एसएई इंडियातर्फे देण्यात आली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link