Next
क्रीडामंत्री तावडे उतरले कबड्डीच्या मैदानात
‘स्पोर्टस् एक्स्पो’मध्ये घेतला खेळांचा आनंद
BOI
Thursday, January 10, 2019 | 06:09 PM
15 0 0
Share this article:


पुणे : फुटबॉल, रायफल शुटींगसारख्या खेळांसोबतच कबड्डीसारख्या पारंपरिक भारतीय खेळांमध्ये स्वत: मैदानात उतरून महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. 

खेलो इंडिया युथ गेम्स आयोजन समितीतर्फे नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. ने आयोजित केलेल्या ‘स्पोर्टस् एक्स्पो’ला त्यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी विविध खेळांमध्ये स्वत: सहभागी होत, ‘खेलेगा महाराष्ट्र, जितेगा राष्ट्र’ असा संदेश तावडे यांनी दिला. 


केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये अॅ्थलेटिक्स ट्रॅकच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये हा एक्स्पो भरविण्यात आला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे राजेश पांडे, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, क्रीडामंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, आशिष पेंडसे, खेलो इंडियाचे माध्यम समन्वयक रवींद्र नाईक यांच्यासह क्रीडा अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या एक्स्पोमध्ये विविध प्रकारचे ६० स्टॉल्स उभारण्यात आले असून, खेळाडूंचे करिअर, विकास आणि तंत्रज्ञान या विषयी यामध्ये माहिती देण्यात येत आहे. याशिवाय खेळाडूंसाठी आहार, फिटनेससंबंधी चर्चासत्रांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिकविषयी माहिती देणारे प्रदर्शनही येथे आहे. 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता यावा, याकरीता लगोरी, रिले, वॉल क्लायम्बिंग, गोटया, फुटबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २० जानेवारीपर्यंत क्रीडाप्रेमींसाठी खुले राहणार आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search