Next
‘सूर्यदत्ता’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
प्रेस रिलीज
Thursday, January 03, 2019 | 04:12 PM
15 0 0
Share this article:

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी डावीकडून (बसलेले) अशोक शिलवंत, डॉ. संजय चोरडिया, राहुल जैन व डॉ. सुषमा चोरडिया.

पुणे : महाविद्यालयात असताना भरलेले कट्टे, ग्रुप्स, सहली, एकत्रित केलेले प्रकल्प, गाजवलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, एकमेकांची जुळलेली मने आणि बरेच काही, अशा एक ना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. नोकरी-व्यवसाय विसरुन विद्यार्थी आपल्या महाविद्यालयीन आठवणींत रमले. निमित्त होते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ‘सुर्यमिलन २०१८’ या माजी विद्यार्थी मेळाव्याचे.

संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात १९ वा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसह ‘सुर्यमिलन’ला आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर आठवणी आणि कौटुंबिक सोहळ्यात रममाण झाला. हा महोत्सव इव्हेंट मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. या वेळी एफएमए डिजिटल, इनोसर्व व आस्माचे व्यवस्थापकीय संचालक राहुल जैन, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिलवंत, डॉ. बी. एम. गायकवाड उपस्थित होते. अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गौस शब्बीर सय्यद याने आपले अनुभव सांगितले.

या वेळी मार्गदर्शन करताना ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, ‘आपल्या ध्येयपूर्तीसाठी योग्य दृष्टिकोन आणि कृतीशीलता असायला हवी. शिस्त, कामातील सचोटी आणि चांगली वृत्ती आत्मसात करून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर दिला पाहिजे. लक्ष्य निश्चितीकरण ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. त्यामुळे एकानंतर एक या पद्धतीने आपली ध्येय गाठायला हवीत. त्याचबरोबर स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.’

मेळाव्यात केक कापून आनंद साजरा करताना माजी विद्यार्थी.

संस्थेचे २३ हजारांहून अधिक विद्यार्थी आज भारताच्या विविध भागात आणि परदेशातही वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. इन्फोसिस, नेस्ले इंडिया, वोडाफोन, फुजीत्सू कन्सल्टिंग, फिलिप्स, कोटक महिंद्रा, एअरटेल, सनगार्ड, अ‍ॅक्सिस बँक, जस्ट डायल यांसह विविध मोठ्या कंपन्यामध्ये संस्थेचे नाव मोठे करत आहेत. अनेक विद्यार्थी उदयोन्मुख उद्योजक आहेत.

या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या ‘सूर्यदत्ता’च्या माजी विद्यार्थ्यांना ‘सूर्यदत्ता अ‍ॅल्युमनी अ‍ॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले. कॉर्पोरेट एक्सलन्ससाठी प्रशांत दवे, कुणाल ओसवाल, आयटी क्षेत्रातील कामगिरीसाठी अभिजीत भडे, इनोव्हेशनसाठी अक्षत श्रीवास्तव, शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी वाहिद शरिफ रझाक इनामदार, उद्यमशीलतेसाठी वंदना चंडेल यांना, वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या डॉ. शैलेंद्रकुमार गुप्ता, माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी अर्शदीप सिंग सलुजा, ग्लोबल प्लेसमेंटसाठी ऐश्वर्या बडवे, पियुष शर्मा, सामाजिक सेवेसाठी गौस शब्बीर सय्यद, सुनीलकुमार शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, माजी विद्यार्थिनी दीप्ती वर्मा यांच्या ‘सम मिडनाइट डेट’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search