Next
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना ‘राउंड टेबल’कडून मदत
प्रेस रिलीज
Monday, May 14 | 02:02 PM
15 0 0
Share this storyपुणे : पूना हॉस्पिटल येथे राउंड टेबल इंडियाची परिषद नुकतीच पार पडली. यात सुमारे १००हून अधिक शुभचिंतक आणि मान्यवर उपस्थित होते. राउंड टेबल इंडियामुळे चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना आयुष्याची एक नवी संधी मिळाली, ही त्यांची सेकंड इनिंग त्यांना ‘राउंड टेबल’मुळेच मिळाल्याने उपस्थित भारावून गेले.

पुना हॉस्पिटल येथे थॅलेसेमिया आजाराबाबत जागरूकता कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘आरटीआय, पीएसआरटी १७७’चे अध्यक्ष ललित पिट्टी यांनी ‘राउंड टेबल’चे ब्रँड अॅम्बेसिडर जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर थॅलेसेमिया जागरूकता कार्यक्रमाची घोषणा केली. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले.

या वेळी पिट्टी म्हणाले, ‘राउंड टेबल इंडियासाठी हा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, शिक्षण क्षेत्रात आम्ही अतिशय विलक्षण कार्य केले असून, आता वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहोत याचा आम्हाला नितांत आनंद आहे, असेच समाजहिताचे कार्य करण्याचे आमचे ध्येय आहे.’

‘पीएसआरटी १७७ने पुण्यातल्या चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या उपचाराचा भार उचलला आहे. या भयंकर आजारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. राउंड टेबल इंडिया नियमित उपचार, औषधे आणि रक्तसंक्रमणासह मुलांना बरे करण्यास मदत करत आहे. ‘राउंड टेबल’ने ब्रँड अॅम्बेसिडर जॅकी श्रॉफ यांच्यासमवेत आजतागायत शिक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणले असून, आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्याचा मानस आहे. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्त विकार आहे जो शरीरात हीमोग्लोबिनची कमतरता आणि प्रमाणापेक्षा कमी लाल रक्त पेशींमुळे होतो. श्वेता तळवळकर, समर्थ मंजुळे, पार्थ फाळके आणि मेघा सेजपाल या चार मुलांचा खर्च राउंड टेबल इंडिया करणार आहे,’ अशी माहिती पिट्टी यांनी दिली.

१९६२ साली स्थापना झालेली राऊंड टेबल इंडिया एक गैर-राजकीय, असांप्रदायिक आणि विना नफा तत्त्वावर कार्यरत गैर-सरकारी संस्था आहे. १८ ते ४० वयोगटातील तरुण व यशस्वी लोक ‘राऊंड टेबल’चे सदस्य आहेत. समुदाय सेवा, स्वयं विकास, शिष्यवृत्ती व आंतरराष्ट्रीय संबंध सुधरविण्याच्या उद्देशाने हे कार्य २० ते २५ सदस्यांच्या ‘टेबल्स’द्वारे सुरू आहे. राऊंड टेबल इंडिया ही राऊंड टेबल इंटरनॅशनलची सक्रिय सदस्य आहे.   

या प्रसंगी बोलताना राउंड टेबल इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि राउंड टेबल इंडियाचे कम्पॅशनेट ब्रँड अॅम्बेसेडर यान टॅवेर्नीयर म्हणाले, ‘हा आजार असणाऱ्यांविषयी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. मुले आपले भविष्य आहेत आणि या रोगाचा भयानक परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला बघणे हे फार दुखद आहे. याच कारणाने आम्ही मदतीचे पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण उपचाराची काळजी घेणार आहोत.’

ब्रँड अॅम्बेसिडर श्रॉफ यांनी ऑडियो व्हिडीओद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी ‘राउंड टेबल’ टीमच्या कार्याची प्रशंसा करीत त्यांना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या.  

रुबी हॉस्पिटलचे डॉ. विजय रामानन गेल्या कित्येक वर्षांपासून या समस्येवर काम करत आहेत. ‘राउंड टेबल’च्या या चळवळीत ते सहभागी झाले असून, या रोगाशी झुंजणाऱ्या मुलांना ठणठणीत बरे करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ‘राउंड टेबल’साठी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link