Next
गुलाबराव महाराज पालखी सोहळ्याचे रोपळे गावात गोल रिंगण
BOI
Monday, July 08, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनाची आस लागली असून, ठिकठिकाणचे पालखी सोहळे आता पंढरपूरसमीप आले आहेत. रोपळे (ता. पंढरपूर) येथे मुक्कामी आलेल्या संत गुलाबराव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी सात जुलै रोजी गोल रिंगण केले. त्यानंतर हा पालखी सोहळा आठ जुलैला भल्या पहाटे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. 

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे रोपळे गावात हरिनामाचा जयघोष अखंडपणे चालू आहे. या मार्गावरून विविध भागांतून आलेल्या पालखी सोहळ्यांचा शेवटचा मुक्काम रोपळे गावात असतो. या मुक्कामात गावातील मंदिरे व शाळांच्या प्रांगणात भजन व कीर्तनाचे कार्यक्रम रंगू लागले आहेत. येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात संत गुलाबराव महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम सात जुलैला होता. 

पालखी सोहळा शाळेच्या प्रांगणात येताच गुलाबराव महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर नेत्रसुखद असा गोल रिंगण सोहळा पार पडला. यात टाळ-मृदंगाच्या तालावर भावीक तल्लीन झाले होते. या वेळी आबालवृद्ध स्त्री-पुरुष वारकऱ्यांनी विविध खेळ खेळून आपला पदक्षीण हलका केला. गवळण व अभंगाच्या ताला-सुरावर भाविकांनी धरलेला ठेका तहान-भूक विसरायला लावणारा होता. विठूनामाचा जयघोष करत वारकरी नृत्यात तल्लीन झाले होते. 

हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी गावातील भाविकांनी प्रशालेच्या प्रांगणात गर्दी केली होती. मुक्कामानंतर आठ जुलैला भल्या पहाटे हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.

(प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गोल रिंगणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search