Next
‘आयसीआयसीआय’ने ओलांडला एक दशलक्ष फास्टॅग्सचा टप्पा
प्रेस रिलीज
Thursday, August 09, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने एक दशलक्ष फास्टॅग्स देण्याचा टप्पा ओलांडला असल्याचे जाहीर केले असून, हा मैलाचा टप्पा साध्य करणारी ही देशातील पहिली बँक ठरली आहे. देशभर सध्या एकूण २५ दशलक्ष टॅग वापरात असल्याने हे यश अधिक महत्त्वाचे आहे.

फास्टॅग हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) टॅगला देण्यात आलेले ब्रँडनेम असून, हा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. हा टॅग वापरण्यास सोपा, रीलोड करण्यासारखा आहे आणि तो टोलचे पैसे आपोआप वळते केले जाण्यासाठी मदत करतो. यामुळे तुम्हाला टोल प्लाझावर रोख पैसे देण्यासाठी थांबावे लागत नाही.

आयसीआयसीआय बँक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) क्षेत्रामध्ये व्यवहारांच्या मूल्याच्या व संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे. या संपूर्ण क्षेत्रात एका महिन्यात केल्या जाणाऱ्या १८ दशलक्ष व्यवहारांपैकी ११ दशलक्ष व्यवहार बँकेद्वारे केले जातात. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सहयोगाने आयसीआयसीआय बँकेने राष्ट्रीय महामार्गांवर इंटर-ऑपरेबल ईटीसी सुविधा राबवण्यासाठी प्रवर्तक भूमिका बजावली आहे.

या यशाविषयी बोलताना ‘आयसीआयसीआय’चे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘देशभर राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) सुरू करण्यामध्ये आमचे योगदान असल्याचा आयसीआयसीआय बँकेला अभिमान वाटतो. मुंबई–वडोदरा कॉरिडॉर येथे ही नाविन्यपूर्ण सेवा सुरू करणारी आमची देशातील पहिली बँक आहे आणि बँकेने यशस्वीपणे मैलाचे टप्पे निर्माण केले असून, त्याचा लाभ आता सर्व बँकांदरम्यान इंटर-ऑपरेबल क्षमता साध्य करण्यासाठी राष्ट्रीय प्रमाणके तयार करण्यासाठी घेतला जात आहे.’

‘ईटीसीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आम्हाला ‘फास्टॅग्स’ देण्याचा एक दशलक्षचा टप्पा पूर्ण करणे शक्य झाले. देशात दरवर्षी संकलित केल्या जाणाऱ्या अंदाजे २० हजार कोटी रुपयांच्या टोलपैकी केवळ १८ टक्के टोल ईटीसी सुविधेद्वारे संकलित केला जातो. या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये डिजिटायझेशनचे प्रमाण वाढवण्यासाठी किती मोठी संधी उपलब्ध आहे, हे यातून दिसून येते. ईटीसीमुळे वाहनांना टोल प्लाझावरील गर्दी टाळणे सोयीचे होते. वाहनांना टोल भरण्यासाठी थांबावे व पैसे द्यावे लागत नाही व यामुळे त्यांचा वेळ वाचतो. हे विचारात घेता, आम्ही अधिकाधिक महामार्ग ईटीसी कार्यक्रमाच्या अंतर्गत आणण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया व इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटे) यांच्याशी चर्चा करत आहोत. फास्टॅग्सची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रमुख ई-कॉमर्स पोर्टलशी सहयोग करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ असे बागची यांनी सांगितले.

ईटीसी सुविधेमुळे वाहनांना एका ‘फास्टॅग’चा वापर करून, बँकेने संपादित केलेल्या विविध टोल प्लाझावर पैसे देता येतात. सध्या, राष्ट्रीय व राज्य अशा दोन्ही महामार्गांवर २१०हून अधिक टोल बूथ हाताळते. ही संख्या, ईटीसी कार्यक्रमांतर्गत सध्या कार्यारत असलेल्या एकूण टोल बूथच्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. ईटीसी सुविधा सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांमध्ये ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ या उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा समावेश असून, त्यामध्ये देशातील जवळजवळ ७० टक्के वाहतूक समाविष्ट होते.

कार्यामध्ये आणखी विस्तार करण्याच्या दृष्टीने, बँकेने ट्रकमालक व मोठ्या राज्य वाहतूक संस्थांसह अंदाजे १० हजार ताफ्याशी सहयोग केला आहे. बँक फास्टॅग्सच्या वापराबद्दल जागृती करण्यासाठी, नामक्कल, वारंगळ, गांधीधाम, वापी, दिल्ली, मनेसर, जेएनपीटी, हुबळी व कानपूर अशा विविध वाहतूक केंद्रांवरील फ्लीट चालकांपर्यंत थेट पोहोचत आहे.

बँकेने विक्री, ग्राहकांच्या शंका समजून घेणे व सोडवणे, यासाठी देशभर ५०० प्रशिक्षित व समर्पित व्यक्तींची नियुक्ती केली आहे व त्याद्वारे ईटीसी सुविधेची सुरळित अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेतली आहे. वैयक्तिक रिटेल ग्राहकांना बँकेच्या वेबसाइटवरून नवा फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो व बँकेचे इंटरनेट बँकिंग, यूपीआय व एनईएफटी सेवांचा वापर करून टॅग डिजिटल पद्धतीने लोड करता येऊ शकतो; तसेच, ही सेवा उत्पादन क्षेत्रापासून सुरू करण्याच्या दृष्टीने बँकेने विविध आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादकांशी सहयोग केला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search