Next
‘कोल्हापुरी चपला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार’
शिवाजी विद्यापीठाचा कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत सामंजस्य करार
BOI
Friday, July 12, 2019 | 04:51 PM
15 0 0
Share this article:

सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि क्लस्टरचे अरुण सातपुते. यावेळी (डावीकडून) व्ही. टी. पाटील, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, डॉ. ए. एम. गुरव, उपमहापौर भूपाल शकोल्हापूर : ‘कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चप्पल क्लस्टरला सर्वतोपरी साह्य करील,’ अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टर समूह यांच्यात ११ जुलैला सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपमहापौर भूपाल शेटे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘कोल्हापुरी चप्पल ही अत्यंत दर्जेदार आहे. या चप्पलला कालसुसंगत असे आधुनिक रूप प्रदान करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान विकास, विपणन व व्यवस्थापन आणि कौशल्य निर्मिती या चार आघाड्यांवर विद्यापीठ सक्रियपणे मदत करील. त्या दृष्टीने हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.’

उपमहापौर तथा क्लस्टरचे अध्यक्ष भूपाल शेटे म्हणाले, ‘कोल्हापूर चप्पलच्या निर्मितीमध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कारागीरांवर पारंपरिक स्वरूपाची अनेक बंधने आहेत. त्या बंधनात तसेच अत्यंत वंचित स्थितीत राहून ते कोल्हापुरी चप्पलचा दर्जा आणि वैभव जपण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आणि कोल्हापुरी चप्पलला तिचे पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी क्लस्टर प्रयत्नशील आहे. कोल्हापुरी चप्पलच्या बरोबरीनेच कोल्हापुरी शूजसुद्धा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड कर्नाटकात नेण्याचे काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे कोल्हापुरी चप्पलला ‘जीआय’ मिळविण्यासाठीही आम्ही प्रयत्न सुरू आहेत. या सर्व बाबींमध्ये विद्यापीठाकडून सहकार्य अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे.’

या सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अरुण सातपुते यांनी स्वाक्षरी केल्या. या वेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

'शिवबा' या क्राफ्टबुकचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, साईप्रसाद बेकनाळकर आणि मान्यवर.या प्रसंगी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या संकल्पनेतून साईप्रसाद बेकनाळकर यांनी साकारलेल्या ‘शिवबा’ या क्राफ्टबुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘शिवबा’ हे क्राफ्ट बुक हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांवर बेतलेले असून, गड-किल्ल्यांच्या निर्मितीसह अनेक अभिनव उपक्रम यात विद्यार्थ्यांसाठी आहेत.

या क्राफ्ट बुकची संकल्पना अभिनव असून, नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले, तर साईप्रसाद बेकनाळकर यांनी अशा आणखी २३ महनीय व्यक्तिमत्त्वांवर बेतलेल्या क्राफ्टबुकच्या निर्मितीचा हा प्रकल्प असून, त्याचे विद्यार्थी-पालकांतून सकारात्मक स्वागत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search