
भारताच्या दहा हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचा हा हर्षद सरपोतदार यांनी थोडक्यात घेतलेला आढावा आहे. हिंदूधर्म, मनुस्मृती, वैदिक, वाङ्मय, चावार्क अशा टप्प्यांमधून हा इतिहास त्यांनी मांडला आहे. पुराणामधील भाकडकथा आणि इतिहास त्यांनी वेगळा करून सांगितला आहे. ऐतिहासिक चिकित्सेची चिकित्सा करताना ‘मोठमोठे विद्वान चिकित्सेच्या नावाखाली भारताचा भव्य नी दैदीप्यमान इतिहास जेव्हा विकृत करू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटते,’ असे ते म्हणतात.
वैदिक शोध व संशोधन या प्रकरणात ‘भारत हा एकेकाळी सर्वात पुढे असलेला देश होता,’ असे विधान करून त्यांचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. ‘प्राचीन ललित वाङ्मय’ या प्रकरणात आद्य साहित्यिक कवी भास, कालिदास, भवभूती आदींच्या साहित्यावर प्रकाश टाकला आहे. पुस्तकात वैदिक वाङ्मयापासून चावट वाङ्मयापर्यंत वेध घेतला आहे.
प्रकाशक : विहंग प्रकाशन
पाने : २७२
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)