Next
ए. एस. राजीव ‘महाबँके’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रेस रिलीज
Monday, December 03, 2018 | 05:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ए. एस. राजीव यांनी दोन डिसेंबर २०१८ रोजी कार्यभार स्वीकारला. यापूर्वी म्हणजेच २२ जानेवारी २०१६ पासून ते इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक होते.
 
राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक या तीन बँकांमधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. चार्टर्ड अकाउंटंट असण्याबरोबरच त्यांच्याकडे कॉर्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बँकिंग, ट्रेझरी, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, एनपीए व्यवस्थापन, नियोजन आणि विकास, मानव संसाधन, दक्षता, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा, वित्त, खाती आणि कर यासह बँकिंगच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तृत अनुभव आणि कौशल्य आहे.
 
राजीव हे गणित पदवीधर असून, एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search