Next
‘ग्रंथाली’तर्फे दिवाळीनिमित्त वाचकांसाठी माहितीचा खजिना
प्रेस रिलीज
Tuesday, October 10 | 02:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्रंथाली प्रकाशनातर्फे दिवाळीनिमित्त विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. सुमेध वडावाला (रिसबूड) लिखित ‘हृदयस्पर्शी माधवबाग’ या पुस्तकाची २३२ पानांची जनआवृत्ती केवळ २५० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘आरोग्य संस्कार’ हे मासिक ३५० रुपयांत पोस्टाने घरपोच मिळवता येणार आहे.

डॉ. साने यांच्या ‘माधवबाग’ची अपूर्व उद्योगकथा ‘हृदयस्पर्शी माधवबाग’ या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. त्याबद्दल ख्यातनाम अभिनेते डॉ. गिरीश ओक म्हणाले, ‘डॉ. रोहित साने यांची प्रभावी भाषणे ऐकण्याची संधी मला मिळाली आहे. त्यांचे भाषण ऐकताना शेकडो महिला, ज्येष्ठ नागरिक जागेवर खिळून राहतात हे मी स्वतः पाहिले आहे. भाषणाद्वारे श्रोत्यांची हृदयरोगाविषयीची भीती ते सहजपणे घालवतात. ते व त्यांचे ‘माधवबाग’मधील सहकारी, आधुनिक तपासण्या, आयुर्वेद पंचकर्म व औषधे आणि जीवनशैलीतील सुधारणा यांच्या संगमातून अनेकांच्या आयुष्याला व आरोग्याला नवी दिशा देत आहे. ‘माधवबाग’च्या या प्रवासाची कहाणी ‘हृदयस्पर्शी माधवबाग’ या पुस्तकातून मांडली आहे. या पुस्तकाद्वारे हा आरोग्य विचर लाखो मराठी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. या पुस्तकाला व ‘माधवबाग’ला माझ्या शुभेच्छा.’

कुटुंबीयांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी भेट म्हणून देण्यासाठी उपयुक्त असलेले ‘आरोग्य संस्कार’ हे मासिक ३५० रुपयांमध्ये वाचकांना घरपोच मिळणार आहे. या मासिकात आहार, व्यायाम, योग, मनःस्वास्थ्य, दंत विकार, विविध आजार व उपचार याचबरोबर सामाजिक कार्य, साहित्य, संस्कृती, छंद यांसारख्या विविध विषयांवरील सोप्या भाषेतील लेखांचा समावेश असतो. ‘१० जणांना वार्षिक वर्गणीदार केल्यास स्वतःसाठी हे मासिक विनाशुल्क घ्या,’ अशी विशेष योजनाही या मासिकासाठी राबवण्यात येत आहे.

‘ग्रंथाली’तर्फे काही दर्जेदार दिवाळी अंक आणि पुस्तके एकत्र करून त्यांचा संच सवलतीच्या दरात दरवर्षी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला जातो. यावर्षीही ही परंपरा कायम राखत ‘ग्रंथाली’ने ही दिवाळी अधिक आरोग्यसंपन्न करण्याच्या दृष्टीने एक विशेष योजना जाहीर केली आहे. ‘आरोग्यसंस्कार’, ‘शब्द रुची’ आणि ‘झी मराठी’ आणि ‘ग्रंथाली’ची संयुक्त निर्मिती असणाऱ्या ‘उत्सव नात्यांचा’ या तीन दर्जेदार दिवाळी विशेषांकांबरोबरच ‘हृदयस्पर्शी माधवबाग’ (सर्वांना ठणठणीत करणारी अपूर्व उद्योगकथा), ‘आहारसंहिता’ (आहार नियोजन : प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी), ‘माझी आरोग्ययात्रा’ (असाध्य आजाराकडून परिपूर्ण स्वास्थ्याकडे) आणि ‘डॉक्टरांच्या जगात’ (डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद लेखन) या माहितीपूर्ण पुस्तकांच्या संचावर विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. या संचाची मूळ किंमत एक हजार २८० इतकी असून वाचकांसाठी दिवाळी भेट म्हणून हा संच केवळ ८०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. ८० रुपये टपाल खर्च आहे.

हे संच पुढील विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत : बुकगंगा (पुणे), अक्षरधारा (पुणे), ज्योती स्टोअर्स (नाशिक), साहित्ययात्रा (ठाणे), मॅजेस्टिक बुक स्टॉल (गिरगाव/शिवाजी मंदिर/ठाणे), मॅजेस्टिक बुक हाउस (दादर/विलेपार्ले/डोंबिवली), आयडियल पुस्तक त्रिवेणी (दादर).

पत्ता : ग्रंथाली प्रकाशन द्वारा वुलन मिल म्युनिसिपल स्कूल, खोली क्र. ९, तळमजला, जे. के. सावंत मार्ग, यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिराशेजारी, माटुंगा (प.) मुंबई - ४०० ०१६
दूरध्वनी : (०२२) २४३० ६६२४, २४२१ ६०५०
ई-मेल : granthaliruchee@gmail.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Gayatri Shikhare About 306 Days ago
It is very nice
0
0

Select Language
Share Link