Next
‘नाद-रूप’च्या वतीने एकदिवसीय ‘कोरिओग्राफी महोत्सव’
सुभाषिते, वाक्प्रचार यांचे अर्थ उलगडणाऱ्या नृत्यरचना
BOI
Tuesday, August 27, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this article:

शमा भाटेपुणे : महाराष्ट्रात १९३० च्या दशकात कोरिओग्राफी (नृत्य दिग्दर्शन) क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लीला सोखे अर्थात मॅडम मेनका यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे यांच्या ‘नाद-रूप’ या नृत्य संस्थेद्वारा शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी एक दिवसीय कोरिओग्राफी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार आहे. कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांसाठी खुला आहे.

कोरिओग्राफी किंवा नृत्य संरचनेची व्याप्ती फार मोठी आहे. तीच समजून घेत व त्याचे पैलू उलगडून दाखवित अधिक सर्जनशील काम व्हावे या दृष्टीकोनातून गुरु शमा भाटे सतत प्रयत्नशील असतात. हा महोत्सव त्याचाच एक भाग असून, यात वाक्प्रचार, सुभाषितांवर आधारित चार संरचनांचे (कोरिओग्राफी) सादरीकरण होणार आहे. हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि आफ्रिकन अशा चार वेगवेगळ्या भाषांमधील वाक्प्रचार व सुभाषितांवर आधारित नृत्यासंरचना या वेळी सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा एक विशेष प्रयोग खास शालेय विद्यार्थ्यांसाठी याच दिवशी (शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी) दुपारी दोन ते चार या वेळेत अण्णाभाऊ साठे सभागृहात सादर होणार आहे.

या कार्यक्रमाचे निरुपण खुद्द शमा भाटे करणार असून, त्यांनीच संरचनाबद्ध केलेली ‘एकता में बल (युनिटी इज स्ट्रेंथ)’ ही रचना संस्थेच्या नृत्यांगना सादर करतील; तसेच ‘अनटील द लायन्स लर्न टू राईट हिस्टरी विल ग्लोरिफ्लाय दी हंटर’ (आफ्रिकन भाषा) ही निखिल परमार व मेघना राव यांनी रचनाबद्ध केलेली रचना ते कंटेंपररी, कथक व कलारीपयटू या नृत्यशैलींच्या मिलाफातून साकारणार आहेत. ‘द मोअर यू सी, द लेस यू नो फॉर शुअर’ या इंग्रजी वाक्प्रचारावर आधारित नृत्यरचना रहस्य, रोमांच यांची अनुभूती देणारी असेल. अवनी गद्रे यांनी ही संरचना रचनाबद्ध केली आहे, तर अमीरा पाटणकर यांनी ‘द क्लॉक डज नॉट मेक अ मॉंक’ या फ्रेंच भाषेतील म्हणीवर आधारित नृत्यरचना दिग्दर्शित केली आहे.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search