Next
शेतकरी व पोलिसांच्या व्यथा सांगणारा जिवंत देखावा
BOI
Tuesday, September 25, 2018 | 11:51 AM
15 0 0
Share this article:पुणे : समाजातील वास्तवावर बोट ठेवत जिवंत देखाव्याद्वारे समाजप्रबोधन करणाऱ्या शिवदर्शन मित्र मंडळातर्फे यावर्षी पोलीस आणि बळीराजा यांच्या व्यथांवर आधारित जिवंत देखावा सादर करण्यात आला.

गणेश विसर्जन सोहळ्यात दरवर्षी या मंडळातर्फे सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर केले जातात. यंदा मंडळ ५७व्या वर्षांत पदार्पण करात आहे. समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आणि घरापासून लांब असलेल्या या पोलिसांसमोरही अनेक समस्या आहेत. यावर प्रकाशझोत टाकताना समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळ्याचे सुदृढ नाते व्हावे, या उद्देशाने ‘शिवदर्शन’ मंडळातर्फे हा जिवंत देखावा सादर करण्यात आला.  पोलिसांच्या व्यथा पाहून टिळक रस्त्यावरील नागरिक भारावून गेले.
 
‘दुष्काळाचे सावट... कर्जाने गिळले शेत, स्वप्नांचा केला घात... संसार मोडूनी पडला आणि फासावर बळीराजा चढला,’ अशी शेतकऱ्यांची अवस्था होऊ लागली आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न दिवसेंदिवस खूप गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायला हवेत आणि समाजानेही त्यासाठी आग्रह धरला पाहिजे या दृष्टीने जिवंत देखावा साकारण्यात आला. यात समाजही या अन्नदात्याचे देणे लागतो, जो स्वत: उपाशी राहून जगाचे पोट भरतो अशा बळीराजासाठी सामाजिक बांधिलकी जोपासू या, बळीराजा आणि त्याच्या कुटुंबियांसाठी एकत्र येऊ या,’ असे आवाहन जिवंत देखाव्याच्या माध्यमातून बळीराजाच्या कुटुंबियांसाठी करण्यात आले आहे.

पुण्याचे उपमहापौर व मंडळाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित बागुल यांच्या संकल्पनेतून या हे देखावे साकारण्यात आले होते. शिवदर्शन मित्र मंडळाचे पदाधिकारी महेश ढवळे,सागर आरोळे, हेमंत बागुल, बाबासाहेब पोलके, सागर बागुल, अशोक शिंदे, अभिषेक बागुल, समीर शिंदे, संतोष पवार, धनंजय कांबळे, अमर ससाणे, अभिजित निकाळजे, राम रणपिसे, कुमार खटावकर, विशाल लोणारे, आकाश खटावकर, अक्षय कदम, रोहित शिंदे, सचिन पवार यांनी या देखाव्यांचे नियोजन केले होते.

गणेश विसर्जनादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांचा पुष्पगुच्छ  व गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search