Next
ठाण्यात ८८ टक्के धान्यवितरण ई-पॉस मशीनद्वारे
प्रशांत सिनकर
Thursday, November 15, 2018 | 11:41 AM
15 0 0
Share this story

ठाणे : ‘जिल्ह्यात ५९० रास्त भाव दुकानांतून अन्नधान्यांचे ई-पॉस मशीनद्वारे ऑनलाइन वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे ८८ टक्के धान्य या पद्धतीने वितरीत केले असून, या वर्षी ऑगस्टपासून ई-पॉस मशीनद्वारे केरोसीन विक्रीही केली जात आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांकडून गॅस नाही अशी हमीपत्रे घेण्यात येत आहेत. चुकीची हमीपत्रे आढळल्यास शिधापत्रिकाधारकांवर कारवाई केली जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंह वळवी यांनी दिली.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ई-पॉस मशीनमुळे अनावश्यक लाभार्थींच्या संख्येत घट झाली असून, संपूर्ण यंत्रणेत पारदर्शीपणा आणि वितरण प्रक्रियेला वेग आला असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

अधिक माहिती देताना वळवी म्हणाले, ‘जिल्ह्यात केरोसीनचे एकूण एक लाख ३८ हजार ९५३ पात्र शिधापत्रिकाधारक असून, पॉसद्वारे विक्री सुरू झाल्यानंतर ७२ लिटर केरोसीनची गरज कमी झाली आहे. रास्त भाव दुकानांमार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब  योजेनच्या लाभार्थ्यांस धान्य वाटप केले जाते.’

अंत्योदय योजनेच्या मुरबाड येथे १० हजार ९५९, शहापूर येथे १७ हजार ६१७, भिवंडी येथे ११ हजार ४४९, कल्याण येथे दोन हजार ४२५, अंबरनाथ येथे तीन हजार ६७४ अशा एकूण ४६ हजार १७४ शिधापत्रिका आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत मुरबाड येथे १६ हजार ८६८, शहापूर येथे २८ हजार १४, भिवंडी येथे २८ हजार ५७१, कल्याण येथे १२ हजार ५७२, अंबरनाथ येथे सात हजार ६०० असे एकूण ९३ हजार ६२५ शिधापत्रिका आहेत. अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या मिळून एक लाख ३९ हजार ७९९ शिधापत्रिका असल्याचे वळवी यांनी सांगितले.

‘ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात मुरबाड तालुक्यात १९६, शहापूर १६५, भिवंडी १५७, कल्याण ४२ आणि अंबरनाथ ३१ अशी एकूण ५९१ इतकी रास्त भाव धान्य दुकाने आहेत. ऑक्टोबर २०१८मध्ये एक लाख २१ हजार ५२५ म्हणजेच ८८.४२ टक्के शिधापत्रिकाधारकांना पॉसद्वारे आधारबेस धान्य वाटप झाले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे पॉसमध्ये नावनोंदणी झाली नसल्याने त्यांना ऑफलाइन वाटप केले जात आहे. या महिन्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण १०० टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे,’ असे वळवी म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link