Next
एमजी मोटरची देशभरात १३० दालने उघडण्याची योजना
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this story

एमजी मोटर इंडियाच्या भारतातील विस्तार योजनांची माहिती देताना कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा व कार्यकारी संचालक पी. बालेंद्रन
मुंबई : ‘एमजी मोटर इंडियाची  (मॉरिस गॅरेजेस) भारतात २०१९ पर्यंत एकशेतीस  दालने उघडण्याची योजना आहे’, अशी माहिती एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा  यांनी दिली.  या वेळी कंपनीचे कार्यकारी संचालक पी. बालेंद्रन उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘भारतातील आपल्या संचालनासाठी योग्य भागीदारांची निवड करण्याची प्रक्रिया कंपनीने सुरू केली आहे. त्यासाठी ११ मार्च २०१८ रोजी प्रवेशिका मागवण्यात येत असून, आतापर्यंत संकेतस्थळावर दोन हजारपेक्षा अधिक संभाव्य डीलर्सची नाव नोंदणी झाली आहे. एमजी मोटरच्या भारतातील विकास धोरणात मुंबईच्या फायदेशीर ऑटोमोबाइल बाजारपेठेस महत्त्वाचे स्थान आहे. जून २०१९ मध्ये विक्री सुरू होईल, तोपर्यंत मुंबईत कमीत कमी दोन  ते तीन  दालने असावीत अशी आमची योजना आहे. तर, २०२२ पर्यंत तीनशेहून अधिक केंद्रे उभारण्याचा मानस आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून एमजी मोटर इंडिया येत्या पाच ते सहा  वर्षात भारतीय बाजारपेठेत पाच हजार  कोटींची गुंतवणूक करणार आहे’. 

‘सध्या कंपनीच्या हालोल येथील प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत असून,  प्रेस शॉपचे बांधकाम, असेंब्ली लाईन्स व इतर सुविधांचे रीटूलिंग करण्यात येत  आहे. येत्या पाच वर्षात चार  ते पाच  मॉडेल्स दाखल  करण्यासह २०२३ पर्यंत दोन लाख  गाड्या विकण्याचे ध्येय आहे.या दालनांच्या मार्फत एमजी मोटर भारतातील आपले पहिले उत्पादन प्रीमियम एसयूव्हीची विक्री करेल. कंपनी आपल्या वाहनांमध्ये ८० टक्के स्थान-अनुकूल वैशिष्ट्ये असावीत यासाठी प्रयत्न करत आहे. एमजी गाड्यांच्या मालकांना त्यांच्या पैशाचे पुरते मूल्य मिळेल,या उत्पादनांना एक चांगली प्रतिमा मिळेल आणि बाजारपेठेत या उत्पादनाचा आगळा ठसा उमटेल. कंपनी भारतात विद्युत वाहनांकरिता वातावरणाची अनुकूलता आणि मॉडेलच्या व्यावहारिकतेचा अभ्यास करत आहे’,असेही चाबा  यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link