Next
पुणे स्त्री आरोग्य संघटनेची वार्षिक परिषद उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, December 15, 2018 | 05:28 PM
15 0 0
Share this story



पुणे : पुणे स्त्री आरोग्य संघटनेतर्फे (पीओजीएस) हॉटेल फोर पॉइंटस बाय शेअरटन येथे २७ वी वार्षिक परिषद समिट नुकतीच उत्साहात झाली. दोन दिवस चाललेल्या या परिषदेचे उद्घाटन स्थूलता आणि मधुमेह नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले प्रख्यात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र स्त्री आरोग्य संघटनेच्या अध्यक्ष डॉ. रोहिणी देशपांडे, ‘पीओजीएस’च्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे पाटील, पुणे लेडीज या फेसबुक ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सोनिया कोन्जेती आणि ‘पीओजीएस’चे सचिव डॉ. मिलिंद दुगड उपस्थित होते.



या परिषदेदरम्यान देशाच्या विविध भागातून आलेल्या १०० हून अधिक स्त्रीरोगतज्ञांनी चर्चासत्रे, व्याख्यानांमधून महिलांना भेडसावणार्‍या अनेकविध समस्यांवर मार्गदर्शन केले. या परिषदेला ४५० स्त्रीरोगतज्ञ उपस्थित होते.

या वेळी डॉ. दीक्षित यांचे ‘एफर्टलेस वेटलॉस अँड डायबिटीस मॅनेजमेंट’ या विषयावर, तर आशिया खंडातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. शैलेश पुणतांबेकर यांचे ‘युझिंग सायन्स अँड स्किल्स टू क्रीएट स्माइल’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.



‘वर्षभर संस्थेसाठी ‘जस्ट केयर फॉर हर’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम केल्याचा व यशस्वीपणे अनेक परिषद आयोजित केल्याचा मनस्वी आनंद होत आहे,’ अशा भावना ‘पीओजीएस’ अध्यक्ष डॉ. ढोरे पाटील व सचिव डॉ. दुगड यांनी व्यक्त केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link