Next
‘राष्ट्रवादी’तर्फे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 03:39 PM
15 0 0
Share this story

पुणे विभागीय आयुक्त दीपक मेसेकर यांना निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ पक्षनेतेअजित पवार आणि कार्यकर्ते.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी आणि राज्यातील जनतेला न्याय द्यावा यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध मागण्यांचे निवेदन पुणे विभागीय आयुक्त दीपक मेसेकर यांना ११ जून रोजी देण्यात आले. या वेळी पवारांनी  विभागीय आयुक्तांशी विविध विषयांवर आणि मागण्यांवर चर्चा केली.

केंद्र व राज्यसरकारच्या पश्चिम महाराष्ट्र विरोधी भूमिकेचा निषेध करून पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्यासाठी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात दोन ते १२ एप्रिल या कालावधीत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन केले होते. त्याचाच भाग म्हणून हे निवेदन सादर करण्यात आले.

पुणे विभागीय आयुक्तांशी चर्चा करताना अजित पवारनिवेदन देताना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ पक्षनेते पवार यांच्यासह पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय देवकाते, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, पुणे मनपा नगरसेवक बाबुराव चांदेरे, सांस्कृतिक सेलचे प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, पुणे शहर माजी कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, पुणे माजी शहराध्यक्ष, रवींद्र माळवदकर, माजी आमदार कमल ढोलेपाटील, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरेपाटील, पुणे मनपा विरोधी पक्षनेता चेतन तुपे, लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link