Next
डी. गुकेश बनला देशातील सर्वांत लहान ग्रँडमास्टर
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रमही नावावर
BOI
Wednesday, January 16, 2019 | 02:42 PM
15 0 0
Share this article:

डी. गुकेशनवी दिल्ली : चेन्नईच्या अवघ्या साडेबारा वर्षांच्या डी. गुकेशच्या रूपाने देशाला सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर मिळाला आहे. १७व्या दिल्ली आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना त्याने १५ जानेवारी २०१९ रोजी हा विक्रम केला. तो भारतातील पहिल्या, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान वयाचा ग्रँडमास्टर ठरला आहे. 

१२ वर्षे सात महिने आणि १७ दिवस एवढे वय असलेल्या डी. गुकेशची जगातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याची संधी केवळ १७ दिवसांनी हुकली. तो विक्रम रशियाच्या सर्जी कर्जाकिनच्या नावावर आहे. देशातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम चेन्नईच्याच आर. प्रज्ञानंदच्या नावावर होता. तो १२ वर्षे आणि १० महिने वयाचा असताना ग्रँडमास्टर झाला होता. आता मात्र तो विक्रम डी. गुकेशने मोडला आहे. प्रज्ञानंदचा खेळ पाहूनच गुकेशने खेळाची प्रेरणा घेतली होती, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेली तिसरी आणि अंतिम स्पर्धा तो दिल्लीत खेळत होता. त्यात त्याने हे यश मिळविले. गुकेश हा भारताचा ५९वा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्याचे ‘फिडे’चे मानांकन २४९७ एवढे आहे. बॉबी फिशर आणि विश्वनाथन आनंद हे त्याचे आदर्श आहेत. याआधी बार्सिलोना येथे झालेल्या स्पर्धेत तो ही कामगिरी करू शकला असता, तर जगातील सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला असता. तेथे ही कामगिरी शक्य न झाल्याबद्दल तो काहीसा उदास झाला होता; पण पुढील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले तर यश आपोआपच मिळेल, अशा विचाराने त्याने पुढील वाटचाल सुरू ठेवली आणि यशस्वी झाला.

‘मी ग्रँडमास्टर बनलो याचा आनंद आहे. आता मला अधिक मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल. विश्वनाथन आनंद सरांबरोबर कधी तरी खेळण्याची माझी इच्छा आहे,’ अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ‘मी कोणताही ताण न घेता केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यशस्वी झालो,’ असेही त्याने सांगितले. ‘मला माझा खेळ आणखी सुधारायचा आहे आणि सुपर ग्रँडमास्टर बनायचे आहे,’ असे तो म्हणाला. 

(महाराष्ट्रातील खेळाडूंबद्दलचे क्रीडारत्ने हे सदर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anant zende About 214 Days ago
लई भारी सगळच भारी ..शुभेच्छा
0
0

Select Language
Share Link
 
Search