Next
‘कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घ्या’
प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे निर्देश
प्रेस रिलीज
Friday, November 23 | 10:40 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा विद्यापीठाच्या नोकरीत समावेश करून घ्यावा,’ असे आदेश महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी २१ नोव्हेंबर २०१८ रोजी दिले.

कोकण कृषी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकल्पग्रस्तांचा गेली ४० वर्षे रखडलेला प्रश्न पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष मोहिमेअंतर्गत मार्गी लावण्यास चालना मिळाली.

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुंबईतील वरळी येथील कार्यालयात बुधवारी कोकण कृषी विद्यापीठाच्या जागेवरील प्रकल्पग्रस्त, संघटनेचे पदाधिकारी व विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांची भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत निकषपात्र सर्व प्रकल्पग्रस्तांना विशेष मोहिमेद्वारे नोकरीत सामावून घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

या वेळी कृषी विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुभाष चव्हाण, प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणे, सचिव केदार साठे यांसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांचा गेल्या ४० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली निघण्यास चालना मिळाली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link