Next
‘आत्मविश्वासाने सांगा, देश बदललाय’
भाजप कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 12:43 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षांतील विकासाच्या चहुमुखी कामगिरीमुळे ‘अच्छे दिन’ आलेले आहेत आणि देश बदललेला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने ही बाब जनतेला सांगावी,’ असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी २१ जुलैला मुंबईत केले.

भाजप विशेष प्रदेश कार्यसमिती बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे, भाजप प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व संजय धोत्रे, भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि श्याम जाजू, भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगारमंत्री व प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, अतुल भातखळकर, रामदास आंबटकर, सुरेश हाळवणकर व्यासपीठावर उपस्थित होते.


नड्डा म्हणाले, ‘२०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कालावधी देशात सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढली. आपण विकासाच्या विविध कामांच्या आकडेवारीच्या आधारे आणि वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सांगत आहोत की, ‘देश बदल चुका है’ आणि ‘अच्छे दिन आये है’. हा बदललेला भारत आहे, हे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले पाहिजे.’

‘आम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे म्हणजे भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा आहे. भाजपयुक्त भारत करायचा आहे म्हणजे सेवायुक्त भारत करायचा आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशात राजकीय संस्कृतीमध्ये परिवर्तन निर्माण केले आहे. २०१९च्या निवडणुकीत लोकांनी मतपेढीचे राजकारण नाकारले असून, विकासाचे राजकारण स्वीकारले आहे. ही नवी राजकीय संस्कृती घेऊन भाजप पुढे चालली आहे,’ असे त्यांनी सांगितले.


भाजप यशस्वी झाला असला, तरी आपल्याला अजून यशाचे शिखर गाठायचे आहे. गेल्या वेळी सदस्यता अभियानात ११ कोटी भाजप सदस्य झाले होते. या वेळी त्यापेक्षा अधिक सदस्य करायचे आहेत. कोणताही समुदाय आपल्यापासून दूर राहता कामा नये. आपल्याला सर्वांना जोडून घ्यायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर लक्ष देऊन काम करावे. भाजपच्या खासदार, आमदारांनी प्रत्येकाने पक्षाच्या विस्तारासाठी सात दिवस पूर्ण वेळ काम करायचे असल्याचे नड्डा म्हणाले. 

भाजपच्या या एकदिवसीय कार्यसमिती बैठकीला पक्षाचे राज्यातील केंद्रीय मंत्री, केंद्रीय पदाधिकारी, राज्यातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष,  उपाध्यक्ष, नगराध्यक्ष, मंडलाध्यक्ष, मंडल सरचिटणीस यांसह भाजपच्या सर्व मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search