Next
यशवंत मनोहर, पुष्पा भावे
BOI
Monday, March 26, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

जातपात, अंधश्रद्धा, आर्थिक आणि सामाजिक विषमता यांवर कडाडून हल्ला चढवणारे कवी यशवंत मनोहर आणि विचारवंत लेखिका आणि प्रभावी वक्त्या पुष्पा भावे यांचा २६ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.....
यशवंत राजाराम मनोहर 

२६ मार्च १९४३ रोजी येरल्यामध्ये जन्मलेले यशवंत राजाराम मनोहर हे कवी आणि साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचं बालपण अत्यंत खडतर अवस्थेत गेलं होतं. हालअपेष्टा सोसतच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपली काव्यनिर्मितीही सांभाळली. 

‘उत्थानगुंफा’ या पहिल्याच काव्यसंग्रहाने त्यांनी जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी जातपात, अंधश्रद्धा, आर्थिक आणि सामाजिक विषमता यांवर कडाडून हल्ला चढवला. त्यांच्या लेखनातून जणू धगधगता ज्वालामुखीच उसळत असे. समता, न्याय, बंधुता यांविषयी त्यांनी कळकळीनं लिहिलं आहे. 

बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, चार्वाक, सॉक्रेटिस, मार्क्स यांच्याविषयी त्यांनी भरपूर वाचन केलं होतं. त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दादासाहेब रूपवते पुरस्कार, सम्यक जीवन पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, कवी केशवसुत पुरस्कार, दिनकरराव जवळकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

त्यांनी लिहिलेले मूर्तिभंजन, जीवनकाय असे काव्यसंग्रह, रमाई, मी सावित्री जोतिबा फुले, मी यशोधरा अशा कादंबऱ्या, पत्रप्राजक्त हा पत्रसंग्रह आणि अनेक समीक्षापर पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

(यशवंत मनोहर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
...........

पुष्पा भावे

२६ मार्च १९३९ रोजी जन्मलेल्या पुष्पा भावे या विचारवंत लेखिका आणि प्रभावी वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी नाट्यसृष्टीचाही त्यांचा उत्तम अभ्यास आहे आणि त्यांनी त्या संदर्भात पुष्कळ लिखाण केलं आहे. त्यांची नाट्यविषयक समीक्षणं प्रसिद्ध आहेत.

मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या त्या मार्गदर्शन होत्या आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यातही योगदान दिलं आहे. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर त्यांची ठोस भूमिका होती. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता पक्षाचं कामही केलं होतं. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार आणि अनंत भालेराव स्मृती पुरस्कार मिळाला होता. 

गुड मुस्लिम बॅड मुस्लिम, आम्हाला भेटले श्रीराम लागू, जहन्नम, रंग नाटकाचे अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(पुष्पा भावे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link