Next
‘आर्मी इन्स्टिट्यूट’चे रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण
प्रेस रिलीज
Tuesday, February 26, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:पुणे : उच्च शिक्षण क्षेत्रातील एक अव्वल दर्जाची संस्था म्हणून नाव मिळवलेल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने (एआयटी) २५ व्या वर्षांत प्रवेश केल्यानिमित्त २४ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या समारंभाला लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख आणि संस्थेचे प्रमुख आश्रयदाते लेफ्टनंट जनरल सैनी प्रमुख पाहुणे म्हणून, तर इतर अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच माजी लष्करी अधिकारी उपस्थित होते. ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडिअर अभय भट यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि त्यांना संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीबद्दल माहिती दिली.

या वेळी सर्वोत्कृष्ट सर्वांगीण कामगिरीसाठीचा लष्करप्रमुख चषक सुश्री टुटू कुमारी यांना, तर लष्कराच्या दक्षिण विभागप्रमुखांचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीसाठीचा फिरता चषक सुश्री स्वागतिका साहू यांना प्रदान करण्यात आला.दर वर्षीप्रमाणे इंजिनीअरिंग उद्योगातील व्यावसायिकांचा त्यांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल ‘एआयटी’तर्फे सत्कार करण्यात आला. या समारंभात थरमॅक्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक एम. एस. उन्नीकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. इंदूर येथील आयडियाव्हेट सोल्युशन्सचे सहसंस्थापक सतीश चंद्रशेखर (१९९९च्या तुकडीचे विद्यार्थी) यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार देण्यात आला.

संस्थेच्या यशात महत्त्वाचे योगदान दिलेल्या माजी संचालक, प्राचार्य आणि सहसंचालक यांचाही सत्कार या समारंभात करण्यात आला. वरिष्ठ लष्करी अधिकारी, संस्थेचे औद्योगिक क्षेत्रातील सहकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच ‘एआयटी’चे शिक्षक आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते

सैनी यांनी बोलताना ‘एआयटी’चे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ‘‘एआयटी’ ही देशातील एक नामवंत शिक्षण संस्था म्हणून उदयाला येणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या यशाबद्दल मी संस्थेचे आताचे आणि माजी संचालक, अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. संस्थेने आता पुढचे पाऊल उचलून तंत्रज्ञान शिक्षणाबरोबरच सर्वांगीण अध्ययनासाठीची संस्था म्हणून नाव मिळवले पाहिजे. सभोवती घडत असलेल्या बदलांचा विचार करून आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्याबद्दल संस्थेने खुल्या दिलाने विचार केला पाहिजे. त्यातूनच आजच्या गतिमान आणि सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञांनुसार शिक्षण देणारी संस्था म्हणून ‘एआयटी’ नावारूपाला येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search