Next
‘बॉम्बे डाइंग’ची अनोखी ‘क्लिक अवे’ सुविधा
प्रेस रिलीज
Tuesday, May 08 | 12:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘बॉम्बे डाइंग’ने घर सजवण्यासाठी पडदे, बेडशीटस आपल्याला हव्या त्या रंगसंगतीत,ते ही एका क्लिकवर ‘क्लिक अवे’ ही अनोखी सुविधा उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे ही सेवा घरपोच आहे. ग्राहकांनी आपल्या आवडेल ती रंगसंगती, डिझाईन निवडून बॉम्बे डाइंगच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. निवडलेले बेडशीट तीस दिवसांच्या आत फक्त एक हजार ९९९ रुपयांत घरपोच केले जाईल. 

याबाबत अधिक माहिती देताना बॉम्बे डाईंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आलोक बॅनर्जी म्हणाले, ‘या अनोख्या सुविधेमुळे ग्राहकांना यापुढे रंग आणि डिझाइनमधील विसंगतीबद्दल चिंता करण्याचे कारण उरलेले नाही. त्यांच्याकडे रंगांचा एक विस्तृत पर्याय उपलब्ध असून, भिंतीच्या रंगाशी व्यवस्थित जुळणारे पडदे, बेडशीटस डिझाईन करून घेऊ शकतील. या नवीन संकल्पनेने आता गृह सजावटीचे चित्र संपूर्णपणे बदलले जाणार आहे. ग्राहकांना जे हवे ते उपलब्ध करणे आमच्यासाठी आनंददायी आहे.’  
 
‘डिजिटल व्यासपीठावरील या उत्पादन श्रेणीची प्रस्तुती आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. ग्राहकांचा या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला.  

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link