Next
खासदार शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 03:36 PM
15 0 0
Share this story

पुणे : खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून वडगावशेरी येथील इंडियन एज्युकेशनल स्कूल या शाळेला दोन नवीन वर्ग व स्वच्छतागृह बांधण्यासाठी २० लाख तसेच गणेश नगर येथील श्री समर्थ सेवा संस्थेला १० लाखांची मदत करण्यात आली.

या कार्यक्रमांचे भूमिपूजन खासदार शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, ‘संस्थेने समाजासाठी जे काम केले आहे ते खूप कौतुकास्पद आहे. उद्याची पिढी घडवण्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. मुलांनी गुरूजन व आपल्या पालकांचे मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखे आहे. वाघिणीचे दूध पिल्याने इतकी शारिरीक ताकत येते की कुणीच हरवू शकत नाही; तसेच शिक्षणाने बौद्धिक व मानसिक ताकत येते.’

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदीप नाईक यांनी केली. खासदार शिरोळे यांनी खासदार निधी दिल्याने आणि महेंद्र गलांडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामूळे ही देणगी मिळाल्याने नाईक यांनी आभार मानले. महेंद्र गलांडे यांनी आभार मानले.

या वेळी अशोक पलांडे, चंद्रकांत पगारीया, अर्जुन नरके, अशोक सिंघल, राजू हिरेमठ, धनंजय देशमुख, डॉ. मुकुंद दातार, मंगेश मोरे, प्रा. गोडबोले, कविता गलांडे, विशाल साळी, मोहन मातेरे, गणेश गलांडे, वैभव भुजबळ, जालू तारदाळकर, सुरेश गलांडे, आशा गलांडे, विनित वाजपेयी, जयश्री गलांडे, राहुल वाडेकर यांसह पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link