Next
‘युवराज ढमाले कॉर्प’कडून पत्रावळीमुक्त दिंडी उपक्रम
५० दिंड्यांना पाच हजार ताटांचे वाटप
BOI
Tuesday, July 02, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:

युवराज ढमाले यांच्यातर्फे स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले. या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख व अन्य मान्यवर

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पत्रावळी मुक्त व्हावा, यासाठी पुण्यातील युवराज ढमाले कॉर्प या कंपनीच्या वतीने पत्रावळीमुक्त दिंडी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत वाल्हे येथे पालखीचा मुक्काम असताना माऊलींच्या पालखी सोहळ्यातील ५० दिंड्यांमधील पाच हजार वारकऱ्यांना स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले. 

या वेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, विश्वस्त योगेश देसाई, युवराज ढमाले कॉर्पच्या वैष्णवी ढमाले, युवराज ढमाले यांच्यासह विविध दिंड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


युवराज ढमाले म्हणाले, ‘गेली बारा वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यात शक्य तेवढी सेवा करतो. वारकऱ्यांच्या गरजांना अनुसरून उपक्रम हाती घेऊन काम करत आहोत. अनेक वर्षे टिकतील आणि त्यांना उपयोगी पडतील. अशा वस्तू देण्यावर आम्ही भर देतो.’

राजाभाऊ चोपदार म्हणाले, ‘वारीला पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी युवराज ढमाले यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शासन आणि सामाजिक स्तरावर पालखी सोहळा अधिक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध पालखी तळावर विकासात्मक कामे व्हावीत, तसेच पायाभूत सुविधा उभाराव्यात.’ 

रामभाऊ चोपदार यांनी वारकऱ्यांच्या वतीने युवराज ढमाले कॉर्पच्या पुढाकाराचे कौतुक केले. सचिन पवार यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी पालखी सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून काम करत असलेल्या रयत प्रबोधिनी संस्थेतील विद्यार्थ्यांशी युवराज ढमाले यांनी संवाद साधला. यातील राज्यसेवा आणि पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येकी पाच अशा एकूण दहा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा वर्षभराचा भोजन आणि शैक्षणिक खर्च करणार असल्याचे ढमाले यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search