Next
नम्रता दुबे ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 11:08 AM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत डावीकडून अंजना अंजना मास्कारेन्हास, नम्रता दुबे आणि कार्ल मास्कारेन्हा.पुणे : विवाहित महिलांसाठी घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याच्या नम्रता दुबे यांनी छाप पाडली आहे. दिवा पेजेंटतर्फे नुकत्याच झालेल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया २०१८’ स्पर्धेत नम्रता दुबे 'मिसेस वेस्ट इंडिया'च्या (गोल्ड कॅटेगरी) मानकरी ठरल्या आहेत. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत नम्रता दुबे यांनी ही माहिती दिली.

घर आणि नोकरी सांभाळतानाही आपण महिला सक्षमपणे आपल्यातील कलागुणांना वाव देऊ शकतो, हे या स्पर्धेतून मला अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी नम्रता यांचे पती रजनीश दुबे, दिवा पेजेंटच्या अंजना मास्कारेन्हास आणि कार्ल मास्कारेन्हास आदी उपस्थित होते.

नम्रता दुबे व्यवसायाने पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये एचआर मॅनेजर आहेत. त्यांचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. याआधी त्यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७-ग्लॅमरस’, ‘मिस डून’ आदी किताब मिळवले आहेत. महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता याविषयी अनेक उपक्रम राबविले आहेत. लोकशाही प्रक्रियेत महिलांना सहभाग वाढविण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. आरोग्य, कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण यासाठी महाविद्यालयात कार्यशाळा घेतल्या आहेत. महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी स्वयंरोजगार आणि इतर उपक्रम राबविले आहेत.

नम्रता दुबेया यशाबद्दल बोलताना नम्रता म्हणाल्या, ‘कुटुंबाचा पाठिंबा आणि अंजना मॅडम व कार्ल सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा किताब पटकावू शकले. माझ्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांसाठी प्रोत्साहित केले. या यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे; तसेच समाजाच्या हितासाठी भरीव काम करण्याची इच्छा आहे.’

अंजना म्हणाल्या, ‘दिवा पेजेंटतर्फे नुकतीच ही ‘दिवा मिस इंडिया’ स्पर्धा घेण्यात आली. देशभरातून २६ सौंदर्यवती या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. ओळख परेड, रॅंप वॉक, प्रश्नोत्तरे आदी निकषांवर ही निवड करण्यात येते. २५ ते ४० वयोगटातील या महिला होत्या. या स्पर्धेतील विजेत्या सौंदर्यवती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link