Next
‘हिरो मोटोकॉर्प’च्या विक्रीपश्चात सेवेने रचला नवा मापदंड
प्रेस रिलीज
Wednesday, April 25 | 02:47 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या देशातल्या सर्वांत मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने हिरो जेन्युइन (मूळ) पार्ट्स आणि अ‍ॅक्सेसरींच्या विक्रीसाठी नवीन ई-कॉमर्स पोर्टल सादर करून दुचाकी उद्योगक्षेत्रात नवा मापदंड रचला आहे.

खास ‘हिरो’ ग्राहकांना वाहिलेल्या ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एचजीपीमार्ट डॉट कॉम’ या ई-कॉमर्स व्यासपीठावर ‘हिरो’चे जेन्यूईन पार्ट्स आणि अ‍ॅक्सेसरीज केवळ एका क्लिकवर ग्राहकांना विकत घेता येणार आहेत.

या नवीन संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट कंपनीमार्फत घरबसल्या वस्तूंची खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. ग्राहकांच्या मोटरसायकल किंवा स्कूटरला सुयोग्य असे पार्ट्स व अ‍ॅक्सेसरीजच ग्राहकांना या पोर्टलवर उपलब्ध होत असून, ही उत्पादने थेट ग्राहकांच्या घरी डिलिव्हर केली जातील.

बाजारपेठेतील अग्रेसर कंपनी म्हणून ‘हिरो मोटोकॉर्प’ने आपल्या सर्वच सेवांमध्ये नवीन संशोधन आणण्यावर भर दिला आहे. त्यांच्या नवीन ई-वाणिज्य संकेतस्थळाच्या माध्यमातून, देशभरातील ग्राहकांपर्यंत अधिक सक्षमपणे पोहोचण्याचा कंपनी प्रयत्न करीत आहे.

ग्राहकांपर्यंत ही उत्पादने वेळेत व सुरळीत पोहोचावीत, यासाठी ‘हिरो मोटोकॉर्प’तर्फे हब-स्पोक मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे. या फास्ट-मुव्हिंग पार्ट्सची सहज उपलब्धता आणि सुरळीत पुरवठा देशभर यशस्वी करण्यासाठी १०० पार्ट्स वितरकांचे जाळे कंपनीने देशभरात विणले आहे.

ग्राहकांना हवे असलेले पार्ट्स शोधण्याची प्रक्रिया व खरेदी सोपी व सरळ करण्यासाठी या व्यासपीठावर ग्राहकांसाठी दुचाकीचे मॉडेल निवडा, पार्ट्सचा प्रकार निवडा आणि पार्ट निवडा व पर्चेसवर क्लिक करा या तीन महत्त्वाच्या व सोप्या पायर्‍या आहेत. भारतभरातील ग्राहकांपर्यंत या उत्पादनांची डिलीव्हरी नीट व्हावी, यासाठी ‘हिरो मोटोकॉर्प’ने ‘डेल्हिवरी’ या भारतातील ई-वाणिज्य लॉजिस्टीक्स सेवा पुरवठादार कंपनीशी भागीदारी केली आहे. ‘हिरो मोटोकॉर्प’ने यापूर्वी स्नॅपडीलशी भागीदारी केली असून, केवळ एकाच वर्षात या भागीदारीअंतर्गत पाच लाख दुचाकींची विक्री करण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link