Next
कंगना रनौत साकारणार ‘जयललिता’
‘जया’मधून उलगडणार जयललिता यांचा जीवनपट
BOI
Saturday, March 23, 2019 | 05:10 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘बायोपिक’ हा सध्या बॉलीवूडपटांचा ट्रेंड बनला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खेळाडू, कलाकार, राजकीय नेते यांचे अनेक जीवनपट आले आहेत. त्यात आता तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा जीवनपट उलगडणारा ‘जया’ हा चित्रपट येत आहे. अभिनेत्री कंगना रनौत या चित्रपटात जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

तामिळ आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून हिंदीत या चित्रपटाचे नाव ‘जया’, तर तामिळमध्ये ‘थलाइवी’ असणार आहे. याबाबत नुकतीच कंगनाने माहिती दिली आहे. चित्रपटातील जयललिता यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अनुष्का शेट्टी या दोघींच्या नावाची चर्चा होती, मात्र आता कंगनाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. जयललिता यांच्यावरील बायोपिकचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी यासाठी काम सुरू केले होते. चित्रपटात जयललिता यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, त्यांचे राजकीय आयुष्य यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतने मागील काही काळात दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यातील तिच्या भूमिकांचे कौतुकही झाले आहे. आता ‘जयललिता’ यांची भूमिका कंगना कशा प्रकारे वठवते याची सर्वांना उत्सुकता आहे. 

दिग्दर्शक विजय यांनी यापूर्वी ‘मद्रासपट्टीनम’ आणि ‘देइवा थिरुमगाल’ यांसारख्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘जयललिता हे दक्षिणेच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांचे आयुष्य अनेक प्रकारच्या चढ-उतारांचे राहिले आहे. अनेक आघाड्यांवर त्यांनी आपल्या आयुष्याची लढाई लढली आहे. त्यांचे हे आयुष्य सर्वांसमोर यावे या हेतूने मी हा चित्रपट करत आहे. कंगना ही भूमिका अतिशय छान प्रकारे निभावेल आणि लोक तिला नक्कीच पसंत करतील अशी मला खात्री आहे’, असे मत दिग्दर्शक विजय यांनी व्यक्त केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search