Next
‘भारदे प्रतिष्ठान’चे पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Thursday, June 21 | 03:30 PM
15 0 0
Share this story

डॉ. के. पी. विश्वनाथापुणे : ‘पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, पुरस्काराचे वितरण २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार भवनातील कमिन्स सभागृहात सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे,’ अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अजय भारदे यांनी दिली.

स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ गांधीवादी, राज्याचे पहिले सहकार मंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष पद्मभूषण त्र्यं. शि. तथा बाळासाहेब भारदे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २०१४-१५ पासून गांधीविचार कार्य, मुलभूत कार्य आणि समाज प्रबोधन कार्य या क्षेत्रातील अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानतर्फे ‘देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष आहे.

पाशा पटेलपुरस्कार निवडीसाठी २०१८मध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय निवड समिती गठीत करण्यात आली होती. यामध्ये ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील व कृषी शास्त्रज्ञ धर्मेंद्रकुमार फाळके यांचा समावेश होता. या निवड समितीच्या शिफारशीनुसार उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुलभूत कार्य क्षेत्रासाठी ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, गांधी विचार कार्य या क्षेत्रासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा व समाज प्रबोधन कार्य या क्षेत्रासाठी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : २७ जून २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : कमिन्स सभागृह, पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे-३०.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link