
डहाणू : पालघरच्या डहाणू तालुक्यातील के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मदनकुमार ताजने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या शिक्षिका अनुपमा जाधव यांनी केले होते.
राष्ट्रभाषा हिंदी किती महत्त्वाची आहे व आपल्याला बोलता येणे का महत्त्वाचे आहे, हे जाधव यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. या वेळी हिंदी भाषेतील कविता , चारोळ्या, घोषवाक्येदेखील सादर करण्यात आली. मुख्याध्यापकांनाही हिंदी भाषेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनुपमा जाधव यांनी हिंदी दिनाच्या निमित्ताने शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके आणि फुलझाडे यांची भेट दिली. ‘वाचाल तर वाचाल’ असे सांगून, ‘वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. फुलांप्रमाणे सुंदर बना. फुलांप्रमाणे जीवनात आनंदी राहा,’ असे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या वेळी विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रभाषा हिंदी’ या विषयावर निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे उपप्रमुख रवींद्र बागे, तसेच पर्यवेक्षक मेश्राम हेदेखील या वेळी उपस्थित होते. शेवटी अनुपमा जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
(नुकत्याच होऊन गेलेल्या जागतिक हिंदी संमेलनाच्या निमित्ताने विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)