Next
सोलापुरात फूल बाजार तेजीत
BOI
Saturday, September 15, 2018 | 05:40 PM
15 1 0
Share this article:सोलापूर :
सोलापूर शहर व पंढरपूर येथील फूल बाजारात गौरी-गणपती सणानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने फुलांचा बाजार तेजीत आला आहे.  

गौरी-गणपतीचा उत्सव सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. श्रींची आरास व पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे फूल बाजारात फुलांच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. पंढरपूर येथील फूल बाजारात सध्या फुलांना मागणी जास्त व आवक कमी अशी परिस्थिती निर्णाण झाली आहे. त्यामुळे सर्वच सुगंधी फुलांचे दर वाढले आहेत. 

येथील फूल बाजारात फुलांचे दर वजन किंवा क्रेटच्या आधारे न ठरवता फुलांच्या ढिगाऱ्यावर ढरवले जातात. येथील बाजारात आज (१५ सप्टेंबर २०१८) शेवंतीच्या फुलांना (प्रती ढिगारा) २०० ते २५० रुपये, निशिगंधाच्या फुलांना २५० ते ३०० रुपये, झेंडूला १०० ते १५० रुपये, पांढऱ्या शेवंतीला ३०० ते ३५० रुपये, गुलाब पेंडीला ५० ते १०० रुपये आणि जुईला २०० ते २५० रुपये असा दर मिळाला असल्याचे रोपळे (ता. पंढरपूर) येथील शेतकरी संजय कुलकर्णी यांनी सांगितले. ‘सध्या गौरी-गणपती सणामुळे फुलांचे दर दररोज वाढत आहेत. आज आमच्या निशिगंधाच्या फुलांच्या ढिगाऱ्याला सुमारे ३५० ते ४०० रुपये दर मिळाला,’ असे ते म्हणाले. हे दर नेहमीच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. फुलांची मागणी वाढल्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील फुले तोडून ती वेळेत बाजारात पाठवण्याच्या गडबडीत आहेत.

फुलांचे भाव तेजीत असल्यामुळे हारांच्या भावातही कमालीची वाढ झाली आहे. सुगंधी फुलांच्या हाराच्या जोडीला २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search