Next
‘राजा बहादूर’तर्फे ‘दी मिल्स’ हा प्रकल्प सादर
प्रेस रिलीज
Tuesday, April 16, 2019 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना श्रीधर पिट्टी. शेजारी उमंग पिट्टी

पुणे : जुन्या पुण्याच्या उद्यमशीलतेचे द्योतक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राजा बहादूर मोतीलाल पूना मिल्स लिमिटेड’ने पुणे रेल्वे स्थानकाजवळील आपल्या जागेचे विकसन करून त्या ठिकाणी ‘राजा बहादूर सिटी सेंटर’ या नावाने प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ‘दी मिल्स’ या नावाने सुरू करण्यात आला असून, त्यात आदरातिथ्य सेवा, व्यावसायिक वापराची जागा आणि मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठीच्या जागेचा समावेश आहे.

राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर पिट्टी यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंपनीचे उपाध्यक्ष उमंग पिट्टी या वेळी उपस्थित होते.   

पिट्टी म्हणाले, ‘या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास ‘दी मिल्स’ असे नाव देण्यात आले असून, सहा एकर जागेत तो साकारण्यात आला आहे. यात या ठिकाणच्या कापड गिरणीच्या शेडस् तशाच ठेऊन त्याला उच्च दर्जाची रेस्टॉरंटस् आणि व्यावसायिक वापराच्या जागेचे हब बनवण्यात आले आहे. एकूण एक लाख चौरस फुटांच्या जागेचे विकसन करण्यात आले आहे. यातील ५० हजार चौरस फूट जागेत आदरातिथ्य सेवा आणि ५० हजार चौरस फुटांमध्ये व्यावसायिक वापराची जागा (ऑफिस स्पेस) आहे. आदरातिथ्य सेवांमध्ये खवैय्या पुणेकरांसाठी ‘बोटॅनिका’, ‘तथ्य’, ‘दी मिलर्स’, ‘सिन्को’, ‘बाओबाब’ आणि ‘टू बीएचके’ ही सहा आलीशान रेस्टॉरंटस् या ठिकाणी सज्ज आहेत. याबरोबरच प्रशस्त असे वाहनतळ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी उत्तम पद्धतीने डिझाइन केलेला ‘फंक्शन एरिआ’ हे ‘दी मिल्स’चे आणखी एक वैशिष्ट्य आहे.’

‘राजा बहादूर सिटी सेंटर’च्या पहिल्या टप्प्याच्या विकसनासाठी सुमारे १५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचेही पिट्टी यांनी सांगितले. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचीही आखणी सुरू आहे. उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिट्टी कुटुंबाने १९व्या शतकाच्या शेवटी ‘राजा बहादुर मोतीलाल पूना मिल्स’ सुरू केली आणि कंपनीला ‘पब्लिक लिमिटेड कंपनी’चा दर्जाही प्राप्त झाला. कंपनीने १९६०च्या सुमारास सर्वप्रथम तयार बेडशीट आणि उशांच्या अभ्र्यांचे संच विक्रीस आणले. युरोप व स्कँडिनेव्हियाच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कापड बाजारात कंपनीने चांगला जम बसवला होता.पुढे त्यांनी विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये विस्तार केला. निर्मिती क्षेत्रात प्रामुख्याने मोजमाप आणि आरेखनासाठी वापरली जाणारी ड्रॉइंग व रीप्रोग्राफिक उपकरणे, मिनी ड्राफ्टर आणि उच्च क्षमतेच्या मशीन टूल अॅक्सेसरी उत्पादने बनवणाऱ्या सुरूवातीच्या कंपन्यांमध्ये ‘राजा बहादूर इंटरनॅशनल’चा समावेश होता. ‘पिट्टी’ या ब्रँड नावाने विकल्या जाणाऱ्या उत्पादनांनी आपल्या गुणवत्तेने देशभर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात नाव कमावले.

राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेडने नुकतेच बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केले असून, आपल्या दर्जामुळे त्यांनी अल्पावधीतच उच्चभ्रू व्यावसायिक कार्यालयांच्या उभारणीत ओळख प्राप्त केली आहे. ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे कंपनीला गुणवत्तापूर्ण व वेगवान बांधकामासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे. कंपनीने पुण्यात ‘राजा श्री बिझनेस पार्क’ या नावाने आयटी ऑफिस इमारतीची उभारणी केली असून, ती ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’कडून वापरली जात आहे. खराडी येथे ‘पिट्टी कोर्टयार्ड’ या नावाने एक भव्य सदनिका प्रकल्पही कंपनीतर्फे उभारला जातो आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search