Next
रोपळे गावात शिवजयंती उत्साहात
BOI
Tuesday, February 19, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यात आज (१९ फेब्रुवारी) ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावातही या सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली. 

समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला. रोपळे (ता. पंढरपूर) येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी या सोहळ्य़ाला उत्सहात प्रारंभ झाला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सैनिक नागनाथ रोकडे व ज्योतिराम आदमिले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

रोपळे येथील शिवजयंतीचा कार्यक्रम दर वर्षी उत्साहात साजरा  केला जातो. या वेळी हा सोहळा सामाजिक उपक्रमाने साजरा केला जात आहे. पहिल्या दिवशी गावातील माजी सैनिक नागनाथ रोकडे व ज्योतिराम आदमिले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विविध घटकांच्या प्रतिनिधींच्या हस्ते पूजा केली जाणार आहे. शूरवीर शिवा काशीद प्रतिष्ठान, विश्वकर्मा प्रतिष्ठान, जिजाऊ ब्रिगेड समस्त महिला, संत रोहिदास प्रतिष्ठान, संत गाडगे बाबा मित्रमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, केजीएन मित्रमंडळ, आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक मित्रमंडळ, राजमाता आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, श्री संत सावता माळी मित्रमंडळ, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींच्या हस्ते छत्रपतीच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे. 

राजे शिवाजी चौक संचलित, शिवनेरी ग्रुपच्या वतीने या शिवजयंती सोहळ्याचे नेटके नियोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, मानसिक ताणतणाव निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेतली जाणार आहे. शाहीर अनिता खरात यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाबरेबरच शिवकीर्तनकार गजानन वाव्हळ यांच्या शिवकीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय धनगरी ओळ्या व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘शिवाजी महाराजांनी सर्व समाजातील मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्य निर्माण केले. हा विचार आचरणात आणण्यासाठी आम्ही सर्व समाजबांधव व ग्रामस्थांना एकत्र करून हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत,’ असे सरपंच दिनकर कदम यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search