Next
गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत राज्यस्तरीय चर्चासत्र
पुण्यात शुक्रवारी आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, August 28, 2018 | 05:30 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत बोलताना सुहास पटवर्धन. सोबत आदिती देशपांडे , शंकर भिडे , अंकुश काकडे  आणि मनीषा कोष्टी

पुणे : ‘जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंबंधित समस्या व उपाय’ या विषयावर ‘महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद’, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ व ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (३१ ऑगस्ट) पुण्यात राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. हा मेळावा मनोहर मंगल कार्यालय येथे सायंकाळी पाच ते सात या वेळेत होणार आहे’, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे उपाध्यक्ष सुरेश दोड्डमणी, सचिव मनीषा कोष्टी, पुणे म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे शंकर भिडे, सहकार भारती प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका आदिती देशपांडे उपस्थित होते. 

‘या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार अनिल शिरोळे, मुंबई म्हाडाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट विश्वानस कुलकर्णी,  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सदस्य अविनाश महागावकर, अंकुश काकडे, महाराष्ट्र डिस्ट्रीक्ट को-ऑप हौसिंग फेडरेशन, ठाणेचे  अध्यक्ष सीताराम राणे,  मुंबई डिस्ट्रीक्ट को ऑप हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्ष छाया आजगावकर, अॅफड. व्ही. डी. कर्जतकर, अॅरड. खुर्जेकर सहभागी होणार आहेत. खासदार अॅभड.वंदना चव्हाण, गृहनिर्माण संस्थांशी संबंधित वकील, बँकर्स, क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, सहकार खात्यातील अधिकारी यांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे’,असेही पटवर्धन यांनी सांगितले.  

‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’ गेली ४४ वर्ष पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहरचना संस्थांचे प्रतिनिधीत्व करत आहे. सहकारी गृहसंस्थांना मार्गदर्शन करणे; तसेच शासनाकडे संस्थांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणे आदी कामे महासंघातर्फे केली जातात. महासंघाच्या ‘वास्तुदर्शन’ या मासिकातूनही संस्थांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येते. पुणे जिल्ह्यात सुमारे सोळा हजार गृहनिर्माण संस्था असून, अनेक संस्थांनी त्यांचे पुनर्विकसन यशस्वीपणे केले आहे. काही संस्थांना अनेक कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अंदाजे चार ते पाच हजार  गृहनिर्माण संस्थांना त्यांचे पुनर्विकसन करायचे आहे. या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे’,अशी माहिती मनीषा कोष्टी यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chopada Tanvi Satish About
Ignorance of notices issued by society by 1.defaultor 10 yrs, 2 non submission of legal claim of death of original member, 3.out of 26 ..25 Other all members ready for redevelopment. 4 No any response 5 Conveyance deed is there. Pl ha
0
0
Mohan Nilkanth Dhavale About
These efforts are going to enlighten hope in masses, who are suffering from some erratic and irrational decisions of def and dumb Government officials. All the best.
0
0

Select Language
Share Link
 
Search