Next
पुण्यात ‘महाटेक २०१९’ला सात फेब्रुवारीपासून सुरुवात
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this storyपुणे : पंधरावे ‘महाटेक २०१९’ हे व्यावसायिक प्रदर्शन सात ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय पटांगणावर सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या व्यावसायिक प्रदर्शनात अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, थर्मक्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण कर्वे, बीएसई एसएमई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख अजय ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनासाठी उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आणि इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, स्कूल ऑफ  इन्स्पिरेशनल लिडरशिप, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनात ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून, तीस ते चाळीस हजार उद्योजक भेट देणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून, ऑनलाइन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.

या विषयी माहिती देताना मराठे इन्फोटेकच्या संचालिका गौरी मराठे म्हणाल्या, ‘महाटेक २०१८वर प्रदर्शकांच्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांच्या अभिप्रायामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. त्यामुळे या वर्षीचे महाटेक हे अधिक चांगले व भव्य असेल. दर वर्षी आमचे लक्ष नवीन उपक्रमांवर असते. आम्ही आनंदी आहोत की आम्ही नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान सदार करण्यासाठी आणि त्याचे प्रमोशन करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच प्रदान करतो.’

विनय मराठे म्हणाले, ‘महाटेकने अनेक वर्षांपासून पुण्यातील उत्पादनाच्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख कंपन्या महाटेक प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. महाटेक उद्दिष्ट हे उत्पादन क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देणे आणि यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनासह एसएमईसाठी चार वेगवेगळ्या परिषदांचेदेखील आयोजन केले आहे; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ व्हिजनला पाठींबा हा ‘महाटेक २०१९’चा मूळ उद्देश आहे.’

महाटेक’ मध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आणि उपकरणे भारतीय सेवा क्षेत्रातील संधी यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत. हे प्रदर्शन उद्योजकांसाठी उत्पादने आणि सेवांचा प्रचार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link