Next
‘इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड’ दाखल
प्रेस रिलीज
Thursday, November 15, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इंडसइंड बँकेने डायनॅमिक्स इंकसोबत भागीदारी करून ‘इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड’ हे बटण असलेले भारतातील पहिले इंटरॅक्टिव्ह क्रेडिट कार्ड दाखल केले आहे.

पेमेंट कार्डासाठी क्रांतीकारी ठरेल अशा तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला असून, ग्राहकांना वापरण्यासाठीही ते अतिशय उपयुक्त आहे. बटण दाबल्यानंतर क्रेडिट, चार कालावधीचे पर्याय असणाऱ्या ईएमआयमध्ये व्यवहाराचे रूपांतर (सहा, १२, १८ व २४ महिने) किंवा साठलेले रिवॉर्ड पॉइंट वापरणे या तीन पर्यायांशी संबंधित असलेल्या एलईडी दिव्यांचा वापर करून हे कार्ड ग्राहकाच्या पसंतीचा पेमेंटचा पर्याय दर्शवणार. ग्राहकांना पॉइंट ऑफ सेल (पीओएस) व्यवहारांचे रूपांतर ईएमआयमध्ये करण्यासाठी किंवा रिवॉर्ड पॉइंट रीडिम करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे भरून देण्याची, बँकेला कॉल करण्याची किंवा कोणत्याही बँकिंग चॅनलला लॉग इन करण्याची आवश्यकता नसेल.

या विषयी बोलताना इंडसइंड बँकेचे कन्झ्युमर बँकिंग हेड सुमंत कठपालिया म्हणाले, ‘इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड दाखल केल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कार्डामुळे, क्रेडिट कार्डाच्या वापराने पेमेंट करताना ग्राहकांना विविध पर्याय देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. निवड करण्याचे स्वातंत्र्य पूर्णतः ग्राहकांना देण्यात आले आहे. आमच्या दृष्टीने, ग्राहकांना मिळणारा अनुभव सर्वात महत्त्वाचा आहे आणि आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवांद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.’

इंडसइंड बँकेचे मार्केटिंग व रिटेल अनसिक्युअर्ड अॅसेट्सचे ईव्हीपी व हेड अनिल रामचंद्रन म्हणाले, ‘इंडसइंड बँकेमध्ये आम्ही ग्राहकांना अधिकाधिक सोय देतील, अशी वित्तीय उत्पादने तयार करताना आम्ही ग्राहकांच्या गरजांनुसार नाविन्य समाविष्ट करत आहोत. आम्हाला इंडसइंड बँक नेक्स्ट क्रेडिट कार्ड दाखल करताना अतिशय आनंद होत असून, कार्डामुळे ग्राहकांना ‘पीओसी’ येथे त्यांच्या पसंतीच्या माध्यमातून पेमेंट करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यांना केवळ एक बटण दाबून ही सुविधा वापरता येणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.’

मास्टरकार्डचे दक्षिण आशियाचे डिव्हिजन प्रेसिडेंट पोरुष सिंग म्हणाले, ‘नेक्स्ट क्रेडिट कार्ड हे भारतातील पहिले वैशिष्ट्यपूर्ण क्रेडिट कार्ड दाखल करण्यासाठी इंडसइंड बँकेशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे कार्ड वापरून ग्राहकांना खरेदी करता येईल, क्रेडिट घेता येईल आणि मर्चंट टर्मिनलवर रिवॉर्ड वापरता येतील व त्यामुळे हे आजवरचे सर्वांत नाविन्यपूर्ण उत्पादन ठरणार आहे. मास्टरकार्डने नेहमीच ग्राहकांना प्राधान्य दिले आहे आणि कार्डधारकांना खरेदीचा उत्तम अनुभव व सोय मिळेल यावर आमचे नाविन्य भर देते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link