Next
‘डीकेटीई’मध्ये माजी विद्यार्थ्यांचे संमेलन
प्रेस रिलीज
Thursday, January 31, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’मध्ये संमेलनात मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी सचिन कुलकर्णी.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन डीकेटीईच्या दरबार हॉलमध्ये अतिशय उत्साहात झाले. देश-विदेशांत विविध उच्च पदांवर कार्यरत असणारे २५०हून अधिक माजी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. या वर्षी १९९४साली इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.

‘डीकेटीई’ दर वर्षी २६ जानेवारीला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत अ‍ॅल्युमिनी असोसिएशनचे प्रेसिडेंट धवल देसाई यांनी केले. ‘‘ऑफ डीकेटीई, फॉर डीकेटीई व विथ डीकेटीई’ या नवीन संकल्पनेतून आम्ही उत्तम कार्य माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे कार्य आणखीन मजबूत करू,’ असे त्यांनी सांगितले.

या वेळी उपस्थित माजी विद्यार्थी.

इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी अ‍ॅटोनॉमस डीकेटीईच्या प्रगतीचा आलेख सांगितला व सर्व माजी विद्यार्थ्यांत एकमेकांत सहकार्य वाढवून मातृसंस्थेच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थी हे इन्स्टिट्यूटचे आधारस्तंभ असल्याचे सांगून त्यांनी २५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘डीकेटीई’ची खरी संपत्ती हे माजी विद्यार्थी असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यानंतर सचिन कुलकर्णी, दीपक पाटील, नामदेव नलावडे, जेम्स पेठ्स, मनीष जाधव, श्रीवल्लभ लढ्ढा, नारायण बोहरा, जयेश सिवान, अमित अय्यर या माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. मलिक देबार्शी, संदीप ओंमकार, उमर इनामदार या परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व विचारांची देवाणघेवाण केली. २५ वर्षांपूर्वीच्या आठवणींमध्ये रमत सर्वांनी या मेळाव्याचा भरभरून आनंद घेतला. ‘डीकेटीई’च्या भावी वाटचालीस माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी डे.डायरेक्टर डॉ. यू. जे. पाटील, डॉ. एल. एस. आडमुठे व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

प्रा. खानाज यांनी सूत्रसंचालन केले. ‘डीकेटीई’ माजी विद्यार्थी संघटनेचे सेक्रेटरी प्रा. ए. यू. अवसरे व ‘डीकेटीई’च्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link