Next
करिश्मा कपूरचे कमबॅक
एकता कपूरच्या वेबसीरिजमधून टाकणार वेबदुनियेत पाऊल
BOI
Monday, February 18, 2019 | 06:44 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : बराच काळ बॉलीवूडपासून दूर असलेली अभिनेत्री करिश्मा कपूर आता कमबॅक करण्याच्या विचारात आहे. परंतु आता ती चित्रपट किंवा टिव्हीवर येत नसून एकता कपूरच्या ‘ऑल्ट बालाजी’च्या एका वेबसीरिजमधून दिसणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेली अभिनेत्री करिश्मा कपूर मधला बराच काळ आपल्या मुलांकडे लक्ष देत होती. या काळात ती बॉलीवूडपासून पूर्णपणे दूर होती. आता पुन्हा एकदा करिश्मा नवीन कामाला सुरुवात करत आहे. या वेळेस चित्रपट किंवा टिव्ही शो न करता ती वेबदुनियेत पाऊल ठेवत आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी’तर्फे अमेरिकन टिव्ही सीरिज ‘प्रीटी लिटल लिअर्स’ या शोवर आधारित वेब सीरिज काढण्यात येत आहे. यामध्ये करिश्मा दिसणार आहे. 

‘प्रीटी लिटल लिअर्स’ ही पाच मुलींचे कथानक असलेली एक सीरिज होती. इथे मात्र एकता कपूर पाच आईंची कथा दाखवणार आहे. या पाचपैकी एक करिश्मा असणार आहे. इतर चार कलाकारांची निवड अद्याप पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण झाल्यानंतर इतर नावे घोषित केली जातील असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान २०१२मध्ये आलेला ‘डेंजरस इश्क’ या चित्रपटात करिश्माने काम केले होते. त्यानंतर तिने एकही चित्रपट केलेला नाही. चित्रपटातील करिअर आणि ब्रेक यासंदर्भात करिश्माला विचारले गेले असता ती म्हणाली, ‘मी मध्येच थांबले असे मला वाटत नाही. माझा तेव्हाचा निर्णयही माझ्या दृष्टीने अगदी योग्य होता. बॉलीवूडमध्ये तोपर्यंत मी माझी एक जागा बनवली होती, एक ठराविक यश मला मिळाले होतेच. त्यानंतर माझ्या मुलांना मी वेळ देणे गरजेचे होते. तेच मी केले. आजही नवीन काम सुरू केले असले तरी मी माझ्या कुटुंबाला प्राधान्य देईन.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search