Next
‘महिंद्रा पॉवरॉल’तर्फे नवे डिझेल जनरेटर दाखल
प्रेस रिलीज
Tuesday, April 24, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
महिंद्रा पॉवरॉल महिंद्रा समूहाच्या बिझनेस युनिटने पर्किन्स २००० सीरिज इंजिनाचे बळ असलेले ४००/५००/६२५ केव्हीए डीजी दाखल करून आपल्या उच्च केव्हीए क्षमतेच्या डिझेल जनरेटर्समध्ये (डीजी) विस्तार केल्याचे जाहीर केले आहे. चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीतील संशोधन व विकास केंद्रामध्ये डिझाइन केलेल्या आणि पुण्यानजिकच्या चाकण येथील प्रकल्पात उत्पादन केलेल्या या १२.५ लिटर ते १८ लिटर पर्किन्स इंजिन असलेल्या नव्या जनरेटरचा समावेश महिंद्रा पॉवरॉलच्या उच्च केव्हीए क्षमतेच्या मालिकेत करण्यात आला आहे.

पर्किन्स २००० सीरिज इलेक्ट्रॉनिक इंजिन त्यांच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेसाठी व कार्यक्षमतेसाठी नावाजली जातात. ते टर्बोचार्ज्ड आहेत व एअर-टू-एअर कूल्ड आहेत, तसेच युरो स्टेज IIIA/U.S पर्यंतची प्रमाणपत्रे, ईपीए टिअर थ्री व भारतातील CPCB-II उत्सर्जन मापदंड प्राप्त असलेले आहेत. अवजड औद्योगिक पायावर आधारित असलेले हे इंजिन उत्तम कामगिरी करणारे व विश्वासार्ह आहेत. ४००-६२५ केव्हीए प्रमाणातील प्राइम व स्टँडबाय ऊर्जा डीजी अपेक्षित असलेल्या ग्राहकांसाठी हे इंजिन आदर्श आहे.

‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या पॉवरॉल व स्पेअर्स बिझनेसचे अध्यक्ष–सीपओ हेमंत सिक्का म्हणाले, ‘उच्च केव्हीए क्षमतेची आमची उत्पादने सक्षम करण्याचे ‘पॉवरॉल’चे उद्दिष्ट आहे. आज दाखल केलेल्या ४००/५००/६२५ केव्हीए जेनसेटमुळे आमच्याकडे आता पाच केव्हीए ते ६२५ केव्हीए क्षमतेचे उत्तम दर्जाचे जेनसेट आहेत. यामुळे आम्हाला नव्या श्रेणीमध्ये प्रगती करण्यासाठी व आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाचे जेनसेट देण्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.’

स्मार्ट सर्व्हिस देणारे स्मार्ट डीजी :
नव्या डीजी सेटमध्ये ‘महिंद्रा’च्या विशेष डीजी-सेन्स तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्यामुळे हे डीजी स्मार्ट डीजी ठरले आहेत. स्मार्ट डीजीच्या कामगिरीची तपासणी केव्हाही व दुरूनही करता येते व त्यामुळे डीजी सेटचा अपटाइमही सुधारतो.

प्रामुख्याने या सेवा-केंद्रित उद्योगामध्ये, डीजी सेटची खरेदी करण्याचा निर्णय सर्व्हिस नेटवर्क व आफ्टर सेल्स सर्व्हिस यावर अवलंबून असतो. महिंद्रा पॉवरॉल डीजी सेट्सना देशभरातील २०० हून अधिक डीलर व अंदाजे ४०० टच पॉइंट्स यांच्या विस्तृत सेवा जाळ्याचे पाठबळ आहे. ग्राहकांना तातडीने मदत उपलब्ध करण्यासाठी सेंट्रलाइज्ड कॉल सेंटर २४x७ सदैव तत्पर असते व सुसज्ज आहे. ग्राहकांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी सर्वात योग्य व साजेसा पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञांची टीम मदत करू शकते.

‘महिंद्रा पॉवरोल’विषयी :

कंपनीने २००१-०२ मध्ये वीजनिर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. आर्थिक वर्ष २००२पासून, व्यवसाय प्रचंड वाढीस लागला आणि आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये एक हजार ४०० कोटी रुपये झाला. आज, महिंद्रा पॉवरोलमधील इंजिन पाच केव्हीए ते ६२५ केव्हीए अशा डिझेल जनरेटिंग सेटने ऊर्जा देत आहेत.

स्थापना झाल्यापासून, महिंद्रा पॉवरोलने अल्प काळातच भारतीय जेनसेट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. महिंद्रा पॉवरोल डीजी सेटना भारतातील व जगभरातील दूरसंचार कंपन्यांची प्रथम पसंती आहे. या ब्रँडने गेली सलग ११ वर्षे भारतीय दूरसंचार उद्योगात प्रभुत्व गाजवले आहे.

महिंद्रा पॉवरोलने अलीकडेच २०१४ मधील प्रतिष्ठित डेमिंग प्राइज मिळवले. डेमिंग प्राइझ हा युनियन ऑफ जापनीज सायंटीस्ट अँड इंजिनीअर्सने (जेयूएसई) सुरू केलेला गुणवत्तेसाठीचा जागतिक पुरस्कार असून त्यामार्फत, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम) यशस्वीपणे राबवलेल्या उद्योगांना गौरवले जाते. महिंद्रा पॉवरोलने विविध पुरस्कार जिंकले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search