Next
‘निरोगी आयुष्यासाठी जीवनशैली बदला’
वसंत व्याख्यानमालेत डॉ. दीक्षित यांचा सल्ला
BOI
Monday, April 22, 2019 | 04:16 PM
15 0 0
Share this article:

डॉ. जगन्नाथ दीक्षितपुणे : ‘निरोगी, मधुमेहमुक्त आयुष्य जगायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर जीवनशैली बदला’ असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ आणि ‘दीक्षित डाएट’चे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पुणेकरांना दिला. 

वक्तृत्त्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या १४५ व्या ज्ञानसत्राचे उद्घाटन डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाने झाले. त्या वेळी ते बोलत होते. सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, मंदार बेडेकर आदी या वेळी उपस्थित होते. 

‘‘दीक्षित डाएट’ हा जीवनशैली बदलण्याचा मार्ग आहे. हे पुस्तकी ज्ञान नसून, हा एक सिद्धांत आहे. त्याला प्रयोगाचा आधार घेतला आहे. दीक्षित डाएटला वैज्ञानिक आधार आहे का किंवा त्याबद्दल काही ठोस पुरावे आहेत का, असे प्रश्न अनेक जण विचारतात. खरे तर या डाएटची संकल्पना डॉ. श्रीकांत जिचकर यांनी मांडली. सुरुवातीला मीदेखील त्यांच्यावर विश्वास न ठेवता तीन महिने डाएट करून पाहिले. मला तेव्हा त्याचे महत्त्व जाणवले आणि या चळवळीत उडी घेतली. तु्म्हीही माझ्यावर विश्वास न ठेवता स्वत:वर विश्वास ठेवा. ‘दीक्षित डाएट’ हे मधुमेह उपचारामधील क्रांती ठरले आहे. महाराष्ट्रातून याची सुरुवात झाली याचा अभिमान आहे,’ असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. 

‘दीक्षित डाएटमध्ये काय खावे, याच्या कोणत्याही मर्यादा घालण्यात आलेल्या नाहीत. फक्त ते पदार्थ दिवसातून दोन वेळा ५५ मिनिटांच्या आत सेवन करावेत, असा साधासुधा फॉर्म्युला आहे. भारतीय आहारामध्ये कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट्स) प्रमाण जास्त आहे. ते कमी करून प्रथिनांचा (प्रोटिन्स) वापर वाढवला, तर हे डाएट अधिक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल. आपल्याला जशी वागणुकीची शिस्त आवश्यक असते तशी खाण्याचीही शिस्त लावा,’ असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी केले. 

(डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या रत्नागिरी येथे झालेल्या व्याख्यानाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search