Next
‘होंडा’तर्फे ‘सीबीआर ६५०आर’च्या वितरणाला प्रारंभ
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 03:10 PM
15 0 0
Share this article:


गुरुग्राम (हरियाणा) : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे होंडा बिगविंग येथे आयोजित एका सोहळ्यात ‘मेक इन इंडिया’ स्पोर्ट्स मिडल- वेट मोटरसायकल ‘सीबीआर ६५०आर’च्या वितरणाला प्रारंभ केला.

‘२०१८ मिलान शो’मध्ये दर्शवण्यात आलेली ‘सीबीआर ६५०आर’ ‘होंडा’च्या स्पोर्ट्स मिडल- वेट विभागातील ‘सीबीआर ६५०एफ’ची जागा घेणार असून, ही नवी गाडी फायरब्लेड सुपर स्पोर्ट्स स्टाइलची प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. या गाडीची किंमत ७ लाख ७० हजार रुपये (एक्स शोरूम पॅन भारत) असून, या मॉडेलला देशभरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या प्रसंगी बोलताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘नवी ‘सीबीआर ६५०आर’ ‘होंडा’च्या रेसिंग गाड्यांना शोभेल अशी स्पोर्टी आणि ताकदवान कामगिरी करणारी आहे. या मोटरसायकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला विश्वास वाटतो, की ती तरुण, उत्साही रायडर्सना नवा अनुभव देईल. नोंदणी करणाऱ्या ग्राहकांसाठी वितरणाची सुरुवात करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून, त्यांना सफरीचा भरपूर आनंद मिळावा यासाठी आमच्या शुभेच्छा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search