Next
राष्ट्रीय कॅरमपटू दूर्वा देसाईला दहावीत ९६.६० टक्के
BOI
Monday, June 10, 2019 | 06:36 PM
15 0 0
Share this article:

दूर्वा दर्शन देसाईरत्नागिरी : दृढनिश्‍चय, योग्य दिशेने केलेली मेहनत आणि जिद्द या गुणांच्या बळावर अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधून दूर्वा दर्शन देसाईने दहावीच्या परीक्षेत ९६.६० टक्के गुण मिळवले आहेत. दहावीच्या अभ्यासाबरोबरच कॅरममध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत तिने रौप्यपदक पटकावले आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्हीत यश मिळवल्याने तिच्यावर दुहेरी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डिसेंबर २०१८मध्ये तमिळनाडूमध्ये झालेल्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत दूर्वाने कांस्य व रौप्यपदक पटकावले आहे. मुळची रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावची असलेली दूर्वा रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील आदर्श खेळाडूचा पुरस्कारही तिने आपल्या नावावर केला आहे. अभ्यास आणि खेळाबरोबरच तिला चित्रे आणि रांगोळी काढण्याचा छंद आहे. 

दहावी परीक्षेतील या घवघवीत यशाने दूर्वाने शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भू संपादन विभागात मंडळ अधिकारीपदावर कार्यरत दर्शन देसाई आणि तेजश्री देसाई यांची ती सुकन्या असून, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी देसाई यांची नात आहे. दहावीच्या वर्षात कॅरम स्पर्धांचे दौरे, विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा सांभाळून तिने अभ्यासाबरोबर कॅरमचाही नियमित सराव केला. 

या विषयी सांगताना दूर्वा म्हणाली, ‘खरे तर तामिळनाडूतील राष्ट्रीय स्पर्धा उरकून घरी आल्यानंतर पूर्वपरीक्षेची उजळणी करण्यासाठी जेमतेम चार दिवस मला मिळाले. मला आणि घरात सर्वांनाच खूप टेन्शन आले होते; मात्र बाबा आई आणि आजी, सर्व शिक्षकांच्या ‘डोन्ट वरी ..यू विल..’ या धीराच्या शब्दांनी टेन्शन दूर झाले. दहावी परीक्षेत ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळणार ही दुर्वालाच नव्हे, तर तिचे शाळेतील सर्व शिक्षक आणि आई-बाबांना, आजीला खात्री होती; पण ९५ टक्क्यांहून जास्त गुण मिळतील ही अपेक्षा नव्हती. अभ्यासाला पुरेसा वेळ न मिळाल्याने धाकधूक होती. शेवटच्या दोन महिन्यांत एकाग्रतेने केलेल्या परिश्रमामुळेच मला हे यश मिळाले.’
 
‘सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दुर्वाला अनपेक्षित असे कौतुकास्पद गुण मिळाले. या सर्व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन,’ अशी प्रतिक्रिया दुर्वाचे बाबा दर्शन देसाई आणि आजी शुभांगी यांनी दिली.

शिर्के प्रशालेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका यांच्याबरोबरच आई-बाबा व आजी यांचे प्रोत्साहन, पाठिंब्यामुळे आपल्याला हे यश मिळाले,’ अशी प्रतिक्रिया दूर्वाने व्यक्त केली. तिला भविष्यात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन एरॉनॉटिकल इंजिनीअरिंग क्षेत्रात करिअर करायचेय.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search