Next
पुन्हा एकदा ‘आठवणीतलं पुणं...सायकलींचं पुणं’
येत्या रविवारी ‘पुणे सायक्लोथॉन’चे आयोजन
BOI
Thursday, October 04, 2018 | 02:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे सायक्लोथॉनची माहिती देताना  ‘लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे’च्या अध्यक्ष शिल्पा तांबे,ऐश्वर्या चपळगावकर, उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी व नितीन पवारपुणे : ‘लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. ७ऑक्टोबर) ‘आठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं’ या संकल्पनेवर आधारित ‘पुणे सायक्लोथॉन- दोन’चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे सायक्लोथॉनचे हे दुसरे वर्ष असून, रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत ही सायकल फेरी होणार आहे’,अशी माहिती ‘लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे’च्या अध्यक्ष शिल्पा तांबे व उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मंडळाचे विश्वस्त नितीन पवार, ऐश्वर्या चपळगावकर, राहुल कुलकर्णी उपस्थित होते. 

‘टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या आवारातून या सायक्लोथॉनला सुरुवात होणार आहे. या रॅलीमध्ये लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे व समीक्षा आमटे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रोफेशनल आणि हौशी सायकलिंग ग्रुप्स, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, पोस्टमन, सीए, डॉक्टर्स, व्यावसायिक व नोकरदार अशा सर्वच वर्गातील लोक या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत आहेत. यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीही सहभागाची तयारी दर्शवली आहे. ही सायकल फेरी २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन प्रकारांमध्ये विभागण्यात आली आहे. पहिला मार्ग (२१ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ रस्ता, बावधन, चांदणी चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा आहे. दुसरा मार्ग (१० किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता पुणे विद्यापीठ रस्ता, चतुःशृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, संभाजी पूल, स. प. महाविद्यालय असा आहे. तर तिसरा  पाच किलोमीटरचा मार्ग स. प. महाविद्यालयापासून निघून संभाजी पूल, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, स. प. महाविद्यालय असा आहे’, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.  

‘‘सायकलींचे पुणे’ अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयातून सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष संदेश घेऊन येणारे ग्रुप्स, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, सर्वात छोटा सायकलस्वार अथवा सर्वात मोठा गट अशा काही विशेष सहभागाचे कौतुक या वेळी केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत सहभागी होता येणार असून, इतरांसाठी १०० रुपये देणगी शुल्क असणार आहे’, असे शिल्पा तांबे यांनी सांगितले.  


अधिक माहितीसाठी संपर्क :
शिल्पा तांबे :  ९२२६९ ५८८८८ , योगेश कुलकर्णी : ९८२२२ ७३५४५    

वेबसाइट : http://lokbiradari.deazzle.in/
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search