Next
‘नवा भूजल कायदा सर्वंकष हवा’
BOI
Tuesday, October 02, 2018 | 03:10 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘नैसर्गिक जलस्त्रोत संरक्षित करण्याचा नवा भूजल कायदा-२०१८ सर्वंकष हवा. त्यात नागरिक, संस्थां, कार्यकर्त्यांनी मांडलेली मते सरकारने विचारात घ्यावी,’ अशी मागणी भूजल अभियान, समग्र नदी परिवार, जलदेवता सेवा अभियान आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत केली.

या वेळी जलदेवता सेवा अभियानचे शैलेंद्र पटेल, भूजल अभियानचे रवींद्र सिन्हा, रामनदी स्वच्छता अभियानचे दीपक श्रोते, समग्र नदी परिवारचे ललित राठी, वसुंधरा स्वच्छता अभियानचे पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते. या नव्या कायद्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली असून, यासंदर्भात संस्था, नागरिक, तज्ज्ञांच्या सूचना ३० सप्टेंबरपर्यंत मागवल्या होत्या.

‘आमच्या सूचना सरकारला कळवल्या आहेत. आतापर्यंत पुण्यातून दोन हजार सूचना सरकारपर्यंत गेल्या आहेत. याबाबत राज्य सरकारची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सुनावणीची प्रक्रिया बाकी आहे. नवा कायदा सक्षम, परिपूर्ण, सर्वंकष असावा आणि लोकसहभागाच्या दृष्टीने सुलभ असावा. कारण आताच एखादा जलस्त्रोत वाचवायचा झाल्यास सरकारी यंत्रणांकडून त्याचे नकाशे, नोंदी, कागद मिळत नाहीत. जलस्त्रोत वाचवण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नाही,’ असे या वेळी सांगण्यात आले.

राम नदी, बावधन झरा, नासिक, आळंदी येथील कुंडातील जलस्त्रोत पुनरुज्ज्वीत करताना आलेल्या अडचणींची माहिती या वेळी देण्यात आली.

‘पुरातन नैसर्गिक विहिरी, तलाव, ओढे, नाले, नदी यांच्या नैसर्गिक जागेची लांबी, रुंदी नैसर्गिकरित्या अबाधित होत्या; पण कदाचित प्रत्यक्ष जलसाठ्याचे अधोरेखित नकाशे अपूर्ण किंवा उपलब्ध होत नसल्यामुळे त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जलयुक्त शिवारअंतर्गत जनसहभागाने स्वतःचा वेळ व पैसे खर्चून जलसंसाधनाचे कार्य केले आहे. ते कार्य पुढच्या पिढीसाठी टिकून संरक्षित राहण्यासाठी त्या कार्याचे, जागेचे लांबी, रुंदीचे नकाशे सरकारी दप्तरी अधोरेखित करून जनतेसाठी उपलब्ध व्हावेत म्हणजे अतिक्रमण होऊन नामशेष होणार नाहीत,’ असा सूर या वेळी उमटला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search