Next
विमानतळासंबंधी खासदार शिरोळे यांचे गडकरी यांना निवेदन
प्रेस रिलीज
Friday, December 22, 2017 | 05:53 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली :  पुण्याच्या विमानतळासंबंधी प्रलंबित प्रश्नांसाठी खासदार अनिल शिरोळे यांनी दिल्लीत संसदीय अधिवेशनादरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन एक विस्तृत निवेदन दिले. या वेळी  पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित परवानगी साठी लक्ष घालण्याचे गडकरी यांनी मान्य केले असल्याचे, शिरोळे यांनी सांगितले. या निवेदनात  लोहगाव विमानतळ परिसरातील अतिरिक्त जागेचा प्रश्न व लोहगाव विमानतळ येथील विकासकामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे लोहगाव विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढविण्याच्या दृष्टीने सध्याच्या धावपट्टीची वाढ करणे तसेच सध्याच्या विमानतळ वाहतुकीची क्षमता (तासाला सात फेऱ्या) तासाला ११ फेऱ्या करणे आवश्यक असल्याचे या भेटी दरम्यान गडकरींच्या निदर्शनास आणून दिल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.  या प्रश्नासंबंधी लवकरच इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची बैठक घेण्याचे गडकरी यांनी मान्य केल्याचे शिरोळे यांनी  नमूद केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search