Next
टाटा समूहाचा दुर्मीळ चित्रखजिना पाहण्याची सुवर्णसंधी
प्रेस रिलीज
Wednesday, July 25 | 05:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : छायाचित्रे आपल्याला आठवणीच्या प्रदेशात घेऊन जातात. त्यामुळे जुनी छायाचित्रे पाहणे हा मोठा रंजक अनुभव असतो. असाच अनुभव देण्यासाठी टाटा समूह घेऊन येत आहे ‘व्हिंटेज अॅडव्हर्टायजिंग अँड पब्लिसिटी’ हे एक खास चित्र प्रदर्शन . पुण्यातील ‘टाटा सेन्ट्रल अर्काइव्ज्’तर्फे टाटा समूहाच्या अगदी दुर्मीळ जाहिरात मुद्रणांपासून ते अलीकडच्या १९९० पर्यंतच्या जाहिरातींचा खजिना पुणेकरांना पहायला खुला करण्यात येणार आहे. हे विनामूल्य प्रदर्शन ३० जुलै ते ३१ डिसेंबरपर्यंत, सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

या प्रदर्शनातील संस्मरणीय जाहिराती गतकाळात घेऊन जाईल. बदलते तंत्रज्ञान, स्पर्धात्मक दबाव, बाजारातील मागणी आणि या सगळ्याबरोबर ‘राष्ट्र उभारणीची’ मार्गदर्शक तत्त्वे कायमच हृदयात जपत तयार केलेल्या या जाहिराती टाटा समूहाची वाटचाल तुम्हाला उलगडवून दाखवतील. 

प्रदर्शनातील काही जाहिराती या समाजाचे देणे दर्शविणाऱ्या, काही ‘राष्ट्र उभारणीची’ मार्गदर्शक तत्त्वे जपणाऱ्या, तर काही जाहिराती या बदलत्या फॅशन दाखविणाऱ्या आहेत. याशिवाय ‘इंडियन हॉटेल्स’च्या जाहिराती या भव्यता प्रतीत करणाऱ्या, टाटा एअरलाइन्स आणि एअर इंडियाच्या जाहिराती आकाशात भरारी घेणाऱ्या, टाटा मोटर्सच्या जाहिराती या यशस्वी मार्गक्रमण करणाऱ्या तर टाटा स्टीलच्या जाहिराती या मजबुती दाखविणाऱ्या आहेत.

प्रदर्शनाविषयी : ‘व्हिंटेज अॅडव्हर्टायजिंग अँड पब्लिसिटी’  

स्थळ :  टाटा सेन्ट्रल अर्काइव्ज्, मंगलदास मार्ग, पुणे 
वेळ : ३० जुलै ते ३१ डिसेंबर २०१८, सकाळी १० ते सायंकाळी पाच

अधिक माहितीसाठी : (०२०) ६६६६०९२०५४ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link