Next
‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’मध्ये आता हिऱ्यांचा विभाग
प्रेस रिलीज
Wednesday, April 04, 2018 | 03:18 PM
15 0 0
Share this story

‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ च्या दोन दालनांमध्ये हिरे विभाग सुरू होत आहे. याची घोषणा करताना (डावीकडून) वैशाली गाडगीळ, विदयाधर गाडगीळ, सौरभ गाडगीळ व पराग गाडगीळ.

पुणे : ‘एकशे श्याहऐंशीहून अधिक वर्षांची परंपरा असलेला आणि वेगाने प्रगती करणारा अलंकारांचा जागतिक ब्रँड ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ येत्या सहा  एप्रिल रोजी लक्ष्मी रस्त्यावरील आपल्या प्रमुख दालनात हिऱ्यांचा विभाग सुरू करत आहे,’ अशी माहिती  ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष सौरभ गाडगीळ  यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते पुढे म्हणाले, ‘ फॉरएव्हर मार्क या नामांकित हिरे कंपनीशी आम्ही भागीदारी केली असून, उत्तम दर्जाचे हिऱ्यांचे दागिने या दालनांमध्ये उपलब्ध होतील. लक्ष्मी रस्त्यावरील दालनातील हा नवीन हिऱ्यांचा विभाग अकराशे चौरसफुट इतक्या जागेत विस्तारला असून उत्कृष्ट नेकपीसेस, डँगलर्स, कॉकटेल रिंग्ज अशा खास हिरेजडित अलंकारांच्या संग्रहासाठी संपूर्णतः समर्पित असलेला विभाग आहे. या खास हिऱ्यांच्या विभागाचे उदघाटन सहा एप्रिल रोजी सकाळी निर्मलाताई दानवे त्यांच्या हस्ते होणार आहे. तर, त्याच संध्याकाळी पौड रस्त्यावरील खास हिऱ्यांच्या दालनाचे अनावरण  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि फॉरएव्हर मार्कच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.’

‘पौड रस्त्यावरील खास हिऱ्यांच्या दालनात अलंकारांचा उत्सवच असणार आहे, ज्यामध्ये प्लॅटिनम, रंगीत रत्ने, नवरत्नांचे खडे, खास हलक्या वजनाचे दागिने, बीईंग ह्यूमन ज्वेलरी अशा कलेक्शन्सचा समावेश असणार आहे; तसेच येथे हिरेजडित रोझ गोल्ड पीसेस देखील असतील. याव्यतिरिक्त हा ब्रँड हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीच्या शुल्कावर पन्नास टक्क्यांची सूट अशी आकर्षक ऑफर देऊ करत आहे. ही सवलत येत्या ३० एप्रिलपर्यंतच सुरु राहणार आहे’, असे ही गाडगीळ यांनी नमूद केले. या वेळी ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’चे कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, संचालक विदयाधर गाडगीळ आणि वैशाली गाडगीळ उपस्थित होते.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link