Next
डॉ. अरविंद बुरुंगले पुरस्काराने सन्मानित
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांचे अभिनंदन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे.औंध : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज हडपसरचे विद्यमान प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. अरविंद बुरुंगले यांना ग्लोबल इंटरनॅशनल अससोसिएशनचा ‘फेलो ऑफ इंटरनॅशनल असोसिएशन सायन्स इम्पॅक्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. बुरुंगले यांनी विज्ञान विषयात दिलेले योगदान, संशोधनात केलेली उत्तम कामगिरी, प्रभावी अध्यापन प्रणालीसाठी केलेले प्रयत्न, सहकाऱ्यांना सातत्याने काम करण्यासाठी दिलेली प्रेरणा, नाविन्याचा ध्यास, शिक्षण क्षेत्रात आधुनिक झालेले बदल स्वीकारून सर्जनशील वृत्तीने सातत्यपूर्ण कार्याबद्दल ते या वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.

डॉ. बुरुंगले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले; तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
S.k.kamble kop About 269 Days ago
Congratulations sir
0
0

Select Language
Share Link
 
Search