Next
रत्नागिरीत जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त १५ सप्टेंबरला काव्यसंमेलन
BOI
Friday, September 13, 2019 | 11:15 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त १५ सप्टेंबर २०१९ रोजी निमंत्रित आणि नवोदित कवींचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. 

साहित्य आणि वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी जनसेवा ग्रंथालय गेली ३४ वर्षे विविध उपक्रम राबवत आले आहे. यंदा ३५व्या वर्धापनदिनानिमित्त काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. 

कविवर्य कृ. ब. निकुंब यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने जनसेवा ग्रंथालयातर्फे ‘पाऊस’ या विषयावरील काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातून या स्पर्धेला नवोदित कवींचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतून परीक्षक मंडळाने पहिले तीन क्रमांक घोषित केले असून, त्या व्यतिरिक्त काही उल्लेखनीय कविताही निवडण्यात आल्या आहेत. 

या नवोदित कवींसह रत्नागिरीतील प्रसिद्ध कवयित्री प्रा. जयश्री बर्वे, रश्मी कशेळकर, डॉ. चित्रा गोस्वामी, कवी नितीन देशमुख, देविदास पाटील, प्रसाद पाष्टे यांना कविसंमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.  याच कार्यक्रमात काव्य स्पर्धेतील विजेत्या कवींना पारितोषिके दिली जाणार असून, मान्यवर कवींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

रविवारी, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शेरे नाक्यावरील  राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. रत्नगिरीतील रसिक नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search